मोमिनपुरा ः उघड्यावरच तयार करण्यात आलेले चिकन तंदुरी, कबाब आदी.
मोमिनपुरा ः उघड्यावरच तयार करण्यात आलेले चिकन तंदुरी, कबाब आदी. 
विदर्भ

उघड्यावर चिकन तंदुरीची बजबजपुरी

राजेश प्रायकर

उघड्यावर चिकन तंदुरीची बजबजपुरी
नागपूर : शहरातील प्रत्येक रस्ता, चौकात चिकन तंदुरीची दुकाने थाटण्यात आली असून अप्रशिक्षित "शेफ', स्वच्छतेच्या अभावाने नागपूरकरांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. यातून होणाऱ्या गंभीर आजारांपासून सामान्य नागरिक अनभिज्ञ असल्याने चिकनचे विविध पदार्थ तयार करून विक्री करणाऱ्यांची चंगळ आहे. विशेष म्हणजे उघड्यावर विक्री होत असतानाही महापालिका व अन्न, औषध विभाग झोपेत असून एखाद्याला विषबाधा झाल्यानंतरच प्रशासकीय यंत्रणेचे डोळे उघडणार काय? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
सध्या नागपूर शहरातील प्रत्येक चौक, गल्लीबोळात चिकन तंदुरी, चिकन लॉलीपॉप, चिकन टिक्का, चिली चिकन, चिकन कबाब असे पदार्थ खाताना नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. उघड्यावर तयार केलेले चिकनचे हे पदार्थ घरात विविध आजारही घेऊन येतील, याची पुसटशी कल्पनाही नागरिकांनाही नाही. चिकन तंदुरी तयार करताना विशिष्ट तापमानावर ते भाजले जाते. मात्र, चिकन तंदुरी अनेक दिवसांच्या तेलामध्ये तळून दिली जाते. चिकन लॉलीपॉप चविष्ट करण्यासाठी त्यात अजीनोमोटो नावाचा पदार्थ टाकला जातो. मात्र, या अजीनोमोटोचे किती प्रमाण हवे, याबाबत अप्रशिक्षित "शेफ'ही अनभिज्ञ असतात. त्यामुळे अजीनोमोटोचे प्रमाण अधिक होण्याची शक्‍यता असून त्यामुळे पक्षाघात होण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे चिकन पूर्णपणे शिजले नसल्यास त्यातील बॅक्‍टेरिया शरीरात शिरण्याची व त्यामुळे पक्षाघात होत असल्याचे नुकत्याच एका अमेरिकन संशोधनातून पुढे आले आहे. याशिवाय रात्री शिल्लक राहिलेले चिकनही दुसऱ्या दिवशी विक्री करीत असण्याची शक्‍यता आहे. मोठ्या प्रमाणात चिकन तळले जात असून जुन्याच तेलात नवे तेल ओतण्याचे सातत्य दिसून येते. नागपुरात बिनबोभाटपणे हा गोरखधंदा सुरू असून महापालिका, अन्न व औषधी प्रशासन विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दुकानांभोवती कुत्र्यांचे कळप
तंदुरी चिकन सेंटरवरील चिकन किती दिवसांचे आहे? ते खाण्यास योग्य आहे की नाही? याची कुठलीही चाचणी केली जात नाही. त्यात या दुकानांभोवती अस्वच्छताही दिसून येते. अनेक दुकानांजवळ कुत्र्यांचे कळप लाळ गाळताना दिसून येतात. त्यावरील माश्‍या या उघड्यावरील चिकनवर पर्यटन करताना दिसून येतात.
विषबाधेची शक्‍यता
पुणे जिल्ह्यातील ओतूर गावामध्ये 2016 मध्ये चिकन खाल्ल्याने तीन भावंडांना विषबाधा होऊन यात तिघेही सख्खे भाऊ मरण पावले होते. त्यामुळे चिकनवर ताव मारताना ते शिळे तर नाही, किती दिवसाचे शिळे आहे, ते आरोग्यदायी आहे की नाही? याची खात्री केल्यानंतरच खावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.

उघड्यावरील चिकनचे पदार्थ खाणे टाळावे. नागरिकांनी घरीच हे पदार्थ तयार करावे. रोस्टेड चिकन किंवा उकळलेले चिकन आरोग्याला जास्त लाभदायक आहे. स्वच्छता आवश्‍यक आहे.
- रश्‍मी बुद्धदेव, आहारतज्ज्ञ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT