विदर्भ

चूक विद्यापीठाची, भुर्दंड विद्यार्थ्यांना

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने परीक्षा शुल्काच्या नावावर विद्यार्थ्यांची लूट सुरू केली आहे. परीक्षा शुल्क जमा करण्यासाठी 7 सप्टेंबर ही शेवटची तारीख असताना त्यापूर्वीच शुल्क भरण्याचे संकेतस्थळ बंद करण्यात आले. दोन दिवस संकेतस्थळ बंद ठेवल्यावर सोमवारी महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्काची वसुली करण्यात आल्याची माहिती समोर आली. स्वत:च चूक करून त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसविण्यात येत असल्याची तक्रार विद्यापीठाकडे विद्यार्थ्यांनी केली.
विद्यापीठाच्या प्रवेशाची अंतिम तारीख 4 सप्टेंबर होती. त्यानंतर दोन दिवसांनीच परीक्षा अर्ज करण्यासाठीही शेवटचा दिवस होता. या दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क भरणे अशक्‍य होते. तर आधीच प्रवेश करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांही परीक्षा शुल्क भरण्याची माहिती अगदी शेवटच्या दिवसांमध्ये देण्यात आली. 6 सप्टेंबरला सुटी आणि 7 सप्टेंबरला अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सुटी जाहीर केली होती. अशावेळी विद्यार्थ्यांना शुल्क भरणे शक्‍य नव्हते. मात्र, शासनाने सुटी जाहीर केल्यानंतरही विद्यापीठाने याकडे दुर्लक्ष करीत सोमवारी (ता.9) विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले. जास्तीचे शुल्क भरावे लागत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष आहे. केवळ खासगी महाविद्यालयेच नव्हे तर विद्यापीठाच्या विभागांना परीक्षा शुल्क भरण्याच्या सूचना शेवटच्या दोन दिवसांआधी देण्यात आल्या. त्यातच विद्यार्थ्यांचे प्रवेश, ऑनलाइन नोंदणी आणि परीक्षा शुल्क भरण्याच्या तारखा जवळपास एकाच वेळी आल्या. त्यामुळे विभागांचाही चांगलाच गोंधळ उडाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT