सावली : मेहा (बुजरुक) गावात साकारण्यात आलेल्या अभ्यासिकेत अभ्यास करताना विद्यार्थी.  
विदर्भ

मेहा गावात तरुणांनी साकारली अभ्यासिका, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळाला लाभ

सुधाकर दुधे

सावली (जि. चंद्रपूर)  : गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तालुक्‍यातील मेहा (बुजरुक) गावात अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. यंदा कोरोना काळात लॉकडाउनमुळे मुलांना गावाकडे परतावे लागले. अशावेळी अभ्यासाची चिंता त्यांना सतावत होती. समविचारी तरुण एकत्रित आले आणि अभ्यासिकेचा संकल्प पुढे आला. लॉकडाउनमधल्या वेळेत तरुणांनी श्रमदान केले, तर काहींनी अर्थदान केले. या तरुणांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने गावात अभ्यासिका केंद्र साकारले.

आता शाळा-महाविद्यालये बंद असल्याने कोरोनाचे सर्व नियम पाळून सामाजिक अंतर राखत विद्यार्थ्यांनी अभ्यास सुरू केला आहे. सावली तालुक्‍यातील मेहा (बुजरुक) हे छोटेसे गाव आहे. गावात सातवीपर्यंत शिक्षणासाठी जिल्हा परिषदेच्या शाळेची व्यवस्था आहे. पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थी अंतरगाव, निफंद्रा, विहीरगाव किंवा पाथरीला जातात. पण, येथेही बारावीनंतरच्या शिक्षणाची सोय नाही. त्यामुळे गावातील अनेक तरुण चंद्रपूर किंवा अन्य शहरात गेलीत. काहीजण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत. गावात ग्रंथालय किंवा अभ्यासिका नसल्याने गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी बाहेरगावी राहावे लागत आहे.

तरुणांनी केली व्हॉट्सॲप ग्रुपची निर्मिती

यंदा मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाउन लागले. बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी गावाकडे परतले. नोकरी करणारेही घरी आलेत. आज ना उद्या लॉकडाउन उठेल आणि आपण परत जाऊ, अशी आशा सर्वांना होती. पण महिना-दोन महिने निघून गेल्यानंतरही कोरोनाचा प्रभाव कमी होऊ शकला नाही. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाची चिंता सतावत होती. गावात परत आलेले सर्व विद्यार्थी, तरुण कडक लॉकडाउनमुळे एकमेकांना भेटू शकत नव्हते. अशा वेळी चर्चा करणेही कठीण होत होते. अशातच व्हॉट्‌सॲप ग्रुपची निर्मिती करण्यात आली. यातून एकमेकांशी संवाद होऊ लागला.


विद्यार्थ्यांनी केली वर्गणी गोळा

एकेदिवशी अभ्यासिकेचा विषय चर्चेतून पुढे आला. पण ती साकारायची कशी, हा प्रश्‍न सर्वांपुढे होता. ग्रंथालय व अभ्यासिकेची व्यवस्था झाल्यास स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. अभ्यासिका केंद्रात गरीब आणि ज्यांच्याकडे सुविधा नाही, अशांनाही अभ्यासाची व्यवस्था होईल. जेणेकरून गावातील मुलांना अभ्यास, स्पर्धा परीक्षा आणि नोकरीसाठी तयारी करण्याची संधी मिळेल, अशी विनंती तरुणांनी ग्रामपंचायतीकडे केली. त्याला तीनशे पालकांनी पाठिंबा दिला. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या शेजारी बंद पडलेल्या जागेत या अभ्यासिका केंद्र सुरू करण्यावर एकमत झाले. पण कायदेशीर बाबींच्याही काही अडचणी होत्या. मात्र ग्रामपंचायत कमिटी आणि पंचायत समितीच्या सभापतींनी यात सहकार्य करून हा मुद्दा तडीस नेण्यासाठी मार्गदर्शन केले. नोकरी करणाऱ्या तरुणांनी पैसे गोळा करण्यास सुरवात केली. विद्यार्थ्यांनीही जमेल तशी रक्कम मिळविली. काहीतरी नवीन उपक्रम होत असल्याची खबर मित्रांमार्फत बाहेर पसरू लागली.

भविष्यातील स्तुत्य उपक्रम

भविष्यासाठी स्तुत्य असा उपक्रम बघून अनेकांनी मदतीचे हात पुढे केलेत. सिमेंट, वाळू आणि अन्य साहित्यदेखील खरेदीसाठी सुरुवात झाली. पडक्‍या जागेतील बांधकाम आणि डागडुजीसाठी मजुरांची गरज होती. तो खर्च परवडणारा नव्हता. तेव्हा गावातील हे विद्यार्थी श्रमदान करण्यास पुढे आलेत. हातात कुदळ, पावडे, सब्बल, कुऱ्हाड, घमेला आधी साहित्य घेतले. बघता-बघता कार्य पूर्ण सिद्धीस गेले. विद्यार्थ्यांना आरामात बसून वाचन करण्याची सुविधा झाली.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT