file photo
file photo 
विदर्भ

सासऱ्याच्या रागावर जावयाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पैशाच्या कारणावरून सासऱ्यासोबत झालेल्या वादातून जावई आकाश सिद्धार्थ तागडे (30, रा. गवळीपुरा, गिट्टीखदान) याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गिट्टीखदानमध्ये उघडकीस आली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश हा पेट्रोल टॅंकवर क्‍लीनर होता. त्याचे दीड वर्षापूर्वीच लग्न झाले. तो पत्नीसह गवळीपुऱ्यात राहत होता. काही दिवसांपासून त्याचा सासऱ्यासोबत पैशाच्या कारणावरून वाद सुरू होता. आकाश सोमवारी सायंकाळी वाडी येथे राहणाऱ्या सासऱ्याकडे गेला असता सासऱ्यासोबत वाद झाला. रागाच्या भरात तो रात्री आठ वाजताच्या सुमारास घरी आला. त्याने घरात आल्याबरोबर पत्नीवर आरडाओरड करीत कानशिलात लगावली. "तुझ्या वडिलामुळे अशी वेळ आली' असे वाक्‍य बोलून तो बेडरूममध्ये गेला आणि दार लावून घेतले. काही वेळातच आकाशने पत्नीच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. बराच वेळ होऊनही आकाशने दार उघडले नसल्याने त्याच्या वडिलांनी दार ठोठावले. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही. काहीतरी विपरीत घडल्याचा संशय वडिलांना आला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले असता आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. आकाशला मेयोत नेले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT