विदर्भ

स्वाइन फ्लूने तीन दिवसांत ५ मृत्यू

सकाळवृत्तसेवा

नागपूर - उपराजधानीत चाळीसच्या वर स्वाइन फ्लू बाधित रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती आहेत. स्वाइन फ्लू बाधितांच्या मृत्यूचा आकडा हा अडीच महिने १४ वर थांबला होता. परंतु अचानक मागील तीन दिवसांत ८ स्वाइन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून यात नागपूर शहरात तीन दिवसांत दगावलेल्या पाच जणांचा समावेश आहे. 

ही नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात आहे, मात्र मृत्यूचा आकडा फुगत असतानाही उपचाराचा उतारा मात्र अद्याप सुरू केला नाही.  केवळ जनजागरण करण्यापलीकडे महापालिकेचा आरोग्य विभाग काहीच करीत नसल्याची तक्रार पुढे येत आहे. नागपुरातील शिवशक्तीनगर येथील लता निंबाळकर (५५), गांजाखेत येथील मुश्‍ताक अहमद (६६), वंजारी ले-आउट येथील करिष्मा जनपत दिनेश (२३), मानकापूर येथील ज्योती निमगडे (४६), राजनगर येथील नेहल मेहता (४५) यांचा समावेश आहे. तर मध्य प्रदेशातील देवेंद्रसिंग बैस (३७), महेंद्र चौरसिया (५४) यांच्यासह चंद्रपूर येथील आशा गोटकोंडवार (४८) या स्वाइन बाधितांची नोंद आरोग्य विभागात आहे. सर्व रुग्णांना सर्दी, खोकला, तीव्र तापासह डोळ्यातून पाणी गळण्याची लक्षणे आढळून आली होती. प्रारंभी स्थानिक परिसरात उपचार करण्यात आले. परंतु प्रकृती खालावल्यामुळे अखेर नागपूरच्या विविध खासगी रुग्णालयांत हलवण्यात आले होते. घशातील द्रव्याच्या तपासणीनंतर स्वाइन फ्लू बाधित असल्याचे पुढे आले. 

बाधितांचा आकडा २३२ वर 
१ जानेवारी ते १५ मार्च २०१९ या कालावधीत नागपूरच्या आरोग्य विभागात स्वाइन फ्लूबाधितांची संख्या २३२ वर पोहचली आहे. तर दगावलेल्यांचा आकडा २२ वर गेला आहे. मोठ्या प्रमाणावर स्वाइन फ्लूचे मृत्यू होत आहेत. मेडिकलमधील एका निवासी डॉक्‍टरलाही स्वाइन फ्लूची बाधा झाली होती, असे अहवालातून स्पष्ट झाले होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नागपुरातील आरोग्य विभागाच्या नागपूर येथील उपसंचालक कार्यालयात स्वाइन फ्लू नियंत्रणासाठी बैठक झाली. यात समन्वयाचा अभाव असल्यानेच स्वाइन फ्लूचा आकडा फुगतोय अशी चर्चा रंगली असून यावर नियंत्रणाचे आदेश आरोग्य मंत्रालयातून आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : शंभूराज देसाई यांनी बजावला मतदानाचा हक्क!

SCROLL FOR NEXT