Sword attack by three on suspicion of witchcraft
Sword attack by three on suspicion of witchcraft 
विदर्भ

तू जादूटोणा करतोस म्हणून उकरून काढला वाद आणि पुढे...

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : जादूटोण्याच्या संशयावरून एका व्यक्तीवर तीन जणांनी तलवारी व चाकूने हल्ला केला. ही घटना येथील शास्त्री वॉर्ड मंतर चौक येथे मंगळवारी (ता. 26) दुपारी बाराच्या सुमारास घडली. चक्रधर बोरकर (वय 60, रा. गौतमनगर, मामा चौक, गोंदिया) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गोंदिया शहर पोलिसांनी याप्रकरणी विनोद योगेंद्रसिंह जुरेल (वय 45, रा. शास्त्री वॉर्ड, गोंदिया), अभिषेक राजेश बडगे (रा. सुंदरनगर, गोंदिया) व महेंद्र रामेश्‍वर भालेराव (रा. सुंदरनगर, गोंदिया) यांना अटक केली. चक्रधर बोरकर मंगळवारी दूध डेअरीजवळ बसून होते. बोरकर ज्या ठिकाणी बसले होते, तिथे पोहोचून आरोपी विनोद जुरेल याने "तू जादूटोणा करतोस' असे म्हणत त्यांच्यासोबत भांडण केले.

त्यानंतर आरोपी महेंद्र भालेराव याने तलवार व बेस बॉल बॅटने मारून बोरकर यांना जखमी केले. दरम्यान, विनोद नेवारे बोरकर यांना वाचविण्यासाठी धावले असता आरोपी विनोद जुरेल याने नेवारे त्यांच्यावर गोळीबार केला. यात तेदेखील जखमी झाल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यात संचारबंदी लागू असताना तलावर घेऊन गोंधळ घालणे व गोळीबारसारख्या घटना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात हलविले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT