File photo
File photo 
विदर्भ

वाचा... भल्या पहाटे कसा झाला साकोलीत राडा?

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : साकोली मतदारसंघात भाजप उमेदवार डॉ. परिणय फुके व कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्या समर्थकांमध्ये शुक्रवारी (ता. 18) रात्री उशिरा हाणामारी झाली. या घटनेत डॉ. फुके यांचे चुलत बंधू नितीन फुके आणि नाना पटोले यांचे पुतणे जितेंद्र पटोले गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे साकोली मतदारसंघात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे नोंदविले. मतदारांना पैशाचे पॉकीट वाटप करीत असलेल्या डॉ. फुके यांच्या समर्थकांना पकडून देण्याचा प्रयत्नात तर दुसरीकडे नाना पटोले यांच्याकडून पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याने हा राडा घडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास कॉंग्रेस उमेदवार पटोले यांचे पुतणे तीर्थानंद विनोद पटोले हा लहान भावासोबत चारचाकीने सुकळी येथे जात होता. दरम्यान, लाखांदूर रस्त्यावर एका वाहनाशेजारी गर्दी दिसून आली. तेथे जाऊन पाहणी केली असता, वाहनातील भाजपचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटप करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना विचारणा केली असता, त्यांनी पटोले भावडांना काठी व बुक्‍यांनी मारहाण केली. परंतु, दोन्ही भावांनी दीपक लोहिया, रा. नरखेड या व्यक्तीला पैशाच्या बॅगसह वाहनात बसवून कारवाई करिता साकोली पोलिस ठाण्यात आणले. त्याला बॅगसह पोलिसांच्या ताब्यात दिले. बॅगमधून 17 लाख 74 हजार 600 रुपये रोख सापडली. त्यानंतर पोलिस ठाण्यासमोर फोनवर बोलत असताना डॉ. परिणय फुके व त्यांच्या अंदाजे 30 कार्यकर्त्यांनी तीर्थानंद पटोले यास ओढत जुन्या तहसील कार्यालयाकडे नेले. तेथे त्याला मारहाण केली. यात तीर्थानंद यांच्यासह दोघेजण जखमी झाले.

पटोलेंनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा
या घटनेनंतर गुन्हा दाखल होणार असल्याचे लक्षात येताच डॉ. परिणय फुके यांचे भाऊ नितीन फुके यांनी कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले यांच्याकडून डॉ. फुके यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची तक्रार केली. नितीन फुके रात्रीच्या सुमारास त्यांच्या घरातून हॉटेलमध्ये जात असताना नाना पटोले यांचा पुतण्या व काही समर्थकांची त्यांना वाहनात कोंबले. त्यानंतर नितीन फुके यांना पटोलेंच्या कार्यालयात नेऊन मारहाण केल्याचे म्हटले आहे. यात नितीन फुके गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दोघांच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी परिणय फुके व नाना पटोले यांच्या समर्थकांवर गुन्हे नोंदविले आहे. परिणय फुके यांच्या तक्रारीवरून नाना पटोले व सहकाऱ्यांविरोधात अपहरण आणि मारहाणीचा तर नाना पटोले यांच्या तक्रारीवरून परिणय फुके व त्यांच्या सहकाऱ्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT