file photo
file photo 
विदर्भ

नदीत उलटलेल्या डोंग्याद्वारे तीस किलोमीटरचा प्रवास

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : मासेमारी करताना नदीच्या मुख्य प्रवाहात गेलेली नाव अचानक उलटली. दुथडी भरून वाहणारी नदी त्याला गिळंकृत करायला आतुरली होती. अशात नदी पात्रात आडव्या झालेल्या नावेवर तो स्वार झाला. नाव हेलकावे खात होती. पाणी हनुवटीला टेकले. या अवस्थेत त्याने तीस किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर दैव बलवत्तर असल्याने नाव किनाऱ्याला लागली. बेशुद्ध अवस्थेत तो तेलंगणात पोहोचला. जीवन-मृत्यूचा हा थरार तालुक्‍यातील सोनापूर येथे रविवारी (ता. 11) घडला.
तालुक्‍यातील सोनापूर देशपांडे येथील सुधाकर भोयर यांचा मासेमारीचा व्यवसाय आहे. नदीतील मासे पकडायचे अन्‌ ते बाजारात विकायचे. यातून आलेल्या मिळकतीतून तो आपला आणि कुटुंबाचा उदर्निवाह करीत आहे. सध्या वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. शनिवारी सुधाकर भोयर आणि धनंजय वाघाडे यांनी मासेमारीसाठी वर्धा नदीत नाव टाकली. नदी किनाऱ्यालगत मासेमारी करीत असताना अचानक त्यांची नाव मुख्य प्रवाहात गेली. नावेवरचा तोल सुटला आणि नाव नदी पात्राच्या मध्यभागी उलटली. वाघाडे यांनी हिंमत करून पोहत पोहत किनारा गाठला. मात्र, सुधाकर भोयर पूर्णता: घाबरून गेले. ते प्रवाहात आडव्या झालेल्या नावेवर स्वार झाले. प्रवाहाचा वेग मोठा होता. त्यांनी नावेला घट्ट धरून ठेवले होते. अशाच अवस्थेत सुधाकर यांनी तब्बल तीस किलोमीटर अंतर कापले.
तेलंगणातील ताडपल्ली भागात वर्धा नदीचे पात्र दोन भागात विभागले आहे. त्यातील ताडपल्ली किनाऱ्याला लागलेल्या प्रवाहात त्यांची नाव गेली आणि किनाऱ्याला लागली. मात्र, नाकातोंडात पाणी गेल्याने सुधाकर भोयर बेशुद्ध झाले होते. त्यामुळे गावातील काही नागरिकांनी त्यांना बाहेर काढले. त्यांच्यावर उपचार केला. बाहेरगावी राहणाऱ्या त्यांच्या मुलाला घटनेची माहिती होताच त्याने ताडपल्ली गाठले. त्यानंतर वडिलांना सोबत घेऊन तो सोनापूरला सुखरूप परतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT