File photo
File photo 
विदर्भ

भंडारा-गोंदियातून दोन तर नागपूरमधून एकाने भरला अर्ज

सकाळवृत्तसेवा

नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी आज, मंगळवारी दुसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात भंडारा-गोंदिया मतदारसंघातून दोन तर नागपूरमधून एकाने अर्ज भरला. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या आता सहा झाली आहे.
सोमवारी (ता. 18) अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून दोन, तर नागपूर मतदारसंघातून एका उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात आज दुसऱ्या दिवशी दोन उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. यात पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे भीमराव दुर्योधन बोरकर व सुहास अनिल फुंडे अपक्ष यांचा समावेश आहे. तसेच नागपूरमधून आज उल्हास दुपारे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अकोला, बुलडाणा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात म्हणजे 18 एप्रिलला मतदान होणार आहे. या तीनही ठिकाणी आज, मंगळवारी अर्ज विक्री आणि अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली.
प्रेमासाई महाराजांवर गुन्हा
निवडणूक विभागाची परवानगी न घेता रॅली काढणे, वाहनावर स्वत:चे छायाचित्र असलेले पोस्टर लावणे व चारचाकी वाहने भाड्याने घेऊन बेकायदेशीरपणे पैसे खर्च केल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक विभागाने सुनील नटराजन नायर ऊर्फ प्रेमासाई महाराज यांच्यावर सोमवारी (ता. 18) रात्री 9 वाजतादरम्यान लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. प्रेमासाई महाराज यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सोमवारी यवतमाळ-वाशीम लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT