file photo
file photo 
विदर्भ

लिफ्टमध्ये अडकून तीन महिला वकील बेशुद्ध

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा न्यायालयातील वीजप्रवाह खंडित झाल्याने लिफ्टमध्ये अडकलेल्या तीन महिला वकील बेशुद्ध पडल्या. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्या महिला वकिलांना ताबडतोब खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते.
सुधा सहारे, शाहिन शहा आणि आफरीन अजमत अशी बेशुद्ध पडलेल्या वकिलांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी हा प्रकार घडला. सुमारे पंधरा मिनिटे लिफ्ट बंद होती. यात तीन महिला वकिलांसह सहा जणांचा समावेश होता. गरमी आणि घाबरल्याने तीनही वकिलांची प्रकृती बिघडली होती. त्यांना सुमारे तासभरासाठी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मास्टर किल्ली आणून लिफ्ट उघडण्यात आली. थोडा उशीर झाला असता तर अनेकांच्या जिवावर बेतले असते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा न्यायालयाच्या न्यायमंदिर इमारतीमध्ये आठ माळे आहेत. या परिसरात एकूण शंभरावर न्यायदानाचे कक्ष असून जवळपास चार हजार वकील दररोज प्रॅक्‍टिस करतात. खटल्यांच्या सुनावणीसाठी 20 हजारांवर पक्षकार रोजच न्यायालयात येतात. न्यायमंदिराच्या इमारतीमध्ये जिन्यासह एकूण आठ लिफ्ट आहेत. दुपारी 3 वाजताच्या सुमारास अचानकपणे वीजप्रवाह खंडित झाला. त्यामुळे लिफ्ट मधोमध अडकल्या. वीजप्रवाह खंडित झाल्यानंतर जिल्हा न्यायालयात लिफ्ट व्यवस्थापन सांभाळणाऱ्यांकडून अडकलेल्या व्यक्तींना लिफ्टमधून काढण्यात येत होते. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारातील डाव्या बाजूची लिफ्ट पाचव्या माळ्यावर अडकली होती. लिफ्टमध्ये तीन महिला व पाच पक्षकार होते. जवळपास एक तास ते लिफ्टमध्ये होते. मदत मिळायला उशीर झाल्याने श्‍वास गुदमरून तिन्ही महिला वकील बेशुद्ध पडल्या. न्यायालयातील लिफ्ट व्यवस्थापन करणाऱ्यांनी दरवाजा उघडून सर्वांना बाहेर काढले. बेशुद्ध पडलेल्या महिला वकिलांना ताबडतोब सदर व रविनगर येथील खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. उपचारानंतर संध्याकाळपर्यंत त्यांची प्रकृती स्थीर झाल्याची माहिती डीबीएकडून देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT