उमरेड - सुहास बोकडे यांनी साकारलेली रांगोळी.
उमरेड - सुहास बोकडे यांनी साकारलेली रांगोळी. 
विदर्भ

‘वाघाला वाचवा हो’

सतीश तुळसकर

उमरेड - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य घोषित झाल्यावर वन्यप्राणी संरक्षित राहतील. जंगलाचा राजा वाघाची शिकार होणार नाही अशी आशा वन्यजीवप्रेमींना होती. मात्र, ही आशा फोल ठरताना दिसून येत आहे. दिवाळीच्या रांगोळ्यातून व्याघ्र संवर्धनाचा संदेश उमरेड शहरातून देण्यात आला. 

दिवाळीचा सण आला की प्रत्येकाच्या अंगणात सुंदर, सुबक रांगोळ्या रेखाटण्याची परंपरा आहे. यंदाच्या दिवाळीच्या धामधुमीत उमरेड नगरीतील सुहास बोकडे यांनी त्यांच्या अंगणात आगळीवेगळी व्याघ्र संवर्धनात्मक रांगोळी साकारली. बोकडे यांनी रांगोळीत वाघिणीच्या पायात लपलेला छावा रेखाटला. नुकत्याच यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगलात वनविभागाच्या बचाव पथकाकडून अवनी वाघिणीला ठार केले. त्याच घटनेचे पडसाद सुहास बोकडे यांच्या रांगोळीतून साकारले. रांगोळी साकारण्यासाठी सुहास बोकडे यांच्या पत्नी मनीषा व कन्या प्राप्ती यांनी सहकार्य केले.

सुहास बोकडे यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, वाघाला वाचवायलाच हवे. वाघ मारला जाणे किंवा तो बेपत्ता होणे ही दु:खद घटना आहे. वाघ जंगलाची शान आहे. वाघ नसेल तर जंगलात कोण जाणार. वाघाचे महत्त्व लोकांना कळायलाच हवे. 

जय, जयचंदची आठवण 
बोकडे यांची रांगोळी जरी अवनीच्या प्रसंगावर आधारित असली तरीदेखील अचानक बेपत्ता झालेला वाघ ‘जय’ व त्या पाठोपाठ जयचा मुलगा ‘जयचंद’ याबाबतची चर्चा सुरू झाली होती. जय व जयचंदमुळे उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याला जगभर प्रसिद्धी मिळाली होती. जय व जयचंद बेपत्ता झाल्यापासून पर्यटकांची संख्या घटली आहे. सतत जंगलात चकरा मारणारे बहुचर्चित स्वयंघोषित वन्यजीवप्रेमी, वारंवार येणारे काही देशी व विदेशी पर्यटक, वनाधिकारी याच्यावर रांगोळीच्या निमित्ताने चौफेर टीकास्त्र नागरिकांनी सोडले.

हवशा-नवशांच्या जंगल सफारी 
उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य प्रसिद्ध झाल्याने अनेकांनी जंगलाच्या आसपास जमिनी खरेदी केल्या, पर्यटकांच्या निवारण्यासाठी मोठमोठे विश्रामगृह निर्माण करण्यात आले. रोजगाराला चालना मिळाली. पर्यटकांसोबतच अनेक हवशे-नवशे वन्यजीवप्रेमी दरदोन  दिवसाआड जंगलाकडे धाव घेऊ लागले. जय व जयचंद बेपत्ता झाल्यावर शोधमोहिमांमध्येही हवशा-नवशांचा समावेश होता. मात्र, दोन्ही राजबिंडे वाघ सापडू शकले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT