file photo
file photo 
विदर्भ

वाळूच्या टिप्परने पोलिसाला चिरडले

सकाळ वृत्तसेवा

माजरी (जि. चंद्रपूर) : वणी-वरोरा मार्गावर पाटाळा पोलिस चौकीजवळ वाळूच्या टिप्परने विरुद्ध दिशेने दुचाकीवर येणाऱ्या पोलिस शिपायाला चिरडले. ही घटना सोमवारी सकाळी 11 वाजताच्या सुमाराला घडली. जखमी शिपायाला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
सुनील धनलाल बरोले (वय 30) असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. ते जिल्ह्यातील दुर्गापूर येथील रहिवासी होते. माजरी पोलिस ठाण्यात ते सहा महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. आज सुनील दुचाकीने वरोरा येथे जायला निघाला. माजरी फाट्याजवळ वणीकडे जात असलेल्या टिप्परने दुचाकीला धडक दिली. नागरिकांनी टिप्पर चालक कैलाश ढवळे याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. सुनील बरोले 2016 मध्ये पोलिस दलात कार्यरत झाले. सुनीलचे अडीच महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT