file photo 
विदर्भ

मस्कऱ्या गणपतीने दिली या गावाला ओखळ...३५ वर्षांपासूनची परंपरा..वाचा सविस्तर

रेवनाथ गाढवे

नीलज बु. (जि. भंडारा) : लोकमान्य टिळकांनी समाजात जनजागृती व्हावी, या उद्देशाने राज्यात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. यातूनच गावागावात गणेशोत्सव मंडळे निर्माण झाले. मोहाडी तालुक्‍यात नीलज बु. येथे गेल्या ३५ वर्षांपासून मस्कऱ्या गणेशोत्सवाची परंपरा अखंडपणे सुरू आहे. गावातील आबालवृद्धांच्या सहभागातून हा उत्सव सुरू आहे.

मोहाडी तालुक्‍यातील नीलज बु. हे वैनगंगेच्या काठावरील शेतकऱ्यांचे गावात आहे. येथील लोकांना लहानलहान गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. त्यात गणेशोत्सव साजरा करणे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना होता. जवळच्या देव्हाडा बु. येथे वैनगंगा सहकारी साखर कारखाना सुरू झाला; तेव्हा कारखान्यात निवासी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केली.

गणेशोत्सवानिमित्त तेथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. ते पाहण्यासाठी नीलज बुज. येथील महिला, पुरुष, युवक साखर कारखान्यात जायचे. यातूनच गावातील युवकांनी आपल्या गावातही गणेशोत्सव साजरा करण्याची कल्पना सुचली. पण, आपल्या गावात कोणीही येणार नाही. त्यामुळे अनंत चतुर्दशी नंतर मस्कऱ्या गणपती स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले.

१९८३ पासून सुरुवात

गावात मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळ स्थापन करून १९८३ पासून गणपती स्थापना करायला सुरुवात केली. पहिल्यांदा स्व. कवडू बडगे यांच्या आवारात गणपती स्थापन करण्यात आला. पुढे पाच वर्षे ही परंपरा अविरत सुरू होती. नंतर काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे तीन वर्षे गावातील मस्कऱ्या गणेशोत्सवाला खंड पडला. त्यानंतर गावातील युवकांनी पुढाकार घेऊन १९९१ मध्ये पुन्हा मस्कऱ्या गणपतीची परंपरा सुरू केली ती आजही सुरू आहे.

उत्सवाने दिले गावाला कलाकार

मस्कऱ्या गणपतीच्या निमित्ताने गावात रांगोळी स्पर्धा, दांडपट्टा, संगीत नाटक, तमाशा, कव्वाली, भजन-कीर्तन स्पर्धा, विविध प्रकारची मैदानी खेळांचे आयोजित करण्यात येत होते. गणेशोत्सवात गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. यातून गावातील लहानमोठ्यांना आपल्या अंगातील कलागुणांचे प्रदर्शन करून शाब्बासकी मिळत होती. त्यातून अनेक कलाकार समोर आले.

५१ रुपयांची पहिली मूर्ती

मस्कऱ्या गणेशोत्सव मंडळाचे पूर्व कार्यकर्ते धनवर बडगे सांगतात की, त्यावेळी आम्ही ५१ रुपयांची गणपतीची मूर्ती स्थापन केली होती. गावातील लोकांनी दिलेल्या वर्गणीतून १२०० रुपये गोळा केले होते. यातून १० दिवसांचा गणेशोत्सव आनंदाने साजरा केला होता. यावर्षी कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे मस्कऱ्या गणपती स्थापन केला आहे. परंतु, मूर्ती छोटी असून, घरगुती स्वरूपात गावात उत्सव साजरा करण्यात येत आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: रस्त्याचे काम... तासभर जागेवरच थांब! पिंपरी ‘एमआयडीसी’ परिसरात वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या नियोजनावर संताप..

Solapur Sugarcane payment: साेलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली; शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले तीन हजार ४७६ कोटी, तीव्र संताप व्यक्त!

Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

Pune Health Crisis: पुण्यात तरुणाईवर अदृश्य संकट! ७५ हजारांना बीपी, ४४ हजारांना मधुमेह; जीवनशैलीचे आजार वेगाने पसरतायत

CJI Surya Kant: सुप्रीम कोर्टात अचानक तणाव; सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले... तरुण वकिलाने नेमकं काय केलं?

SCROLL FOR NEXT