Trial of Nagpur Metros on elevated track
Trial of Nagpur Metros on elevated track 
विदर्भ

नागपूर मेट्रोचे 'एलिवेटेड ट्रॅक'वरून 'ट्रायल' 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - विविध चाचण्या पूर्ण करीत असलेल्या नागपूर मेट्रोने आज पिलरवरील रुळावरून (एलिवेटेड ट्रॅक) धावण्याचीही चाचणी पूर्ण करीत शहराच्या इतिहासात सुवर्ण अध्याय जोडला. वर्धा मार्गावरील खापरी ते अजनी स्टेशनपर्यंत ट्रॅकवर रिचर्स डिझाईन ऍन्ड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशनच्या (आरडीएसओ) चाचणीत मेट्रोने यश मिळविले. एलिवेटेड ट्रॅकवरून मेट्रो धावताना बघून नागपूरकरही सुखावले. 

वर्धा मार्गावरल खापरी ते सिताबर्डी इंटरचेंज स्टेशन व हिंगणा मार्गावर सुभाषनगर ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशनपर्यंत प्रवासी सेवेला सुरुवात करण्यासाठी महामेट्रो प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत काल शुक्रवारपासून आरडीएसओचे पथक विविध चाचण्यांसाठी नागपुरात दाखल झाले. आज या पथकाने मेट्रो रेल्वेचे तीन डब्यांची ट्रॅकवरून धावण्यासंदर्भात चाचणी घेतली. कुणालाही याबाबत माहिती नसल्याने ट्रॅकवरून मेट्रो धावताना नागपूरकरही आश्‍चर्यचकीत झाले. या चाचणीमुळे पुढील महिन्यात पहिल्याच आठवड्यात प्रवासी मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT