कन्हान ः दहाचाकीला धडक दिल्यामुळे उलटलेला ट्रक.
कन्हान ः दहाचाकीला धडक दिल्यामुळे उलटलेला ट्रक. 
विदर्भ

नादुरुस्त ट्रकला धडक, चालकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

कन्हान (जि.नागपूर) नागपूर-जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील खंडाळा (घटाटे) शिवारात रस्त्याच्या बाजूला नादुरुस्त स्थितीत उभ्या असलेल्या दहाचाकी ट्रकला मागून येणाऱ्या बाराचाकी ट्रकने धडक दिली. यात दहाचाकी ट्रकचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
शुक्रवारी (ता. 16) रात्री 12.40 वाजता वाडी नागपूर येथून माल भरून बनारसला जाणारा दहाचाकी ट्रक नागपूर-जबलपूर राष्ट्रीय चारपदरी महामार्गावरील तारसा रोड उड्‌डाणपुलासमोर खंडाळा (घटाटे) शिवारात ट्रकमध्ये बिघाड आल्याने अचानक बंद पडला. चालकाने ट्रक बाजूला उभा केला. चालक डॉयनोमा दुरुस्त करीत असताना नागपूरकडून येणाऱ्या बाराचाकी ट्रकच्या चालकाने वाहन निष्काळजीपणे चालवून नादुरुस्त दहाचाकी ट्रकला जोरदार धडक दिली. ट्रक पुढे ढकलल्याने स्वतःच्या ट्रकच्या चाकात चेंदामेंदा होऊन ट्रकचालक संकटमोचन तिवारी (वय 42, रिवा, मध्य प्रदेश) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बाराचाकी वाहनाने जोरदार धडक मारल्याने ट्रक उलटून चालक अजरुद्दीनसुध्दा किरकोळ जखमी झाला. कन्हान पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पवार पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. ट्रकचालकाचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय कामठीला रवाना केला. पुढील तपास सुरू आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT