redgram.jpeg
redgram.jpeg 
विदर्भ

... अन् सापडला तूर खरेदीचा मुहूर्त!

अनुप ताले

अकोला : शासनाच्या हमीभाव केंद्रांवर उद्यापासून प्रत्यक्ष तूर खरेदीला सुरुवात केली जाणार आहे. केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना आज एसएमएस पाठविले जाणार असून, अकोला, अकोट, मूर्तिजापूर येथील केंद्रांवर त्यांच्या तुरीची प्रत्यक्ष खरेदी केली जाणार असल्याचे, जिल्हा उपनिबंधक डॉ.प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.


गेल्या तीन वर्षांपासून हमीभाव केंद्रांवर उशिरा तूर खरेदी सुरू केली जात असल्याने तसेच तांत्रिक अडचणी आणि अपुऱ्या मनुष्य बळाचे कारण पुढे केले जात असल्याने, निम्माहून अधिक तूर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनाच विकावी लागत आहे. व्यापारी वर्गाला मात्र हमीभाव केंद्रांचा प्रचंड लाभ होत असल्याचे जिल्ह्यात चित्र पाहायला मिळाले आहे. यावर्षी तूर उत्पादन चांगले असून, बहुतांश भागात तूर काढली जात आहे. बाजार समित्यांमध्ये सुद्धा तुरीची आवक वाढली आहे. मात्र अजूनपर्यंत प्रत्यक्ष तूर खरेदी सुरू झाली नाही. आता मात्र 5 फेब्रुवारी पासून प्रत्यक्ष तूर खरेदीला सुरुवात केली जाणार असल्याचे, जिल्हा उपनिबंधकांनी सांगितले असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

तिन्ही केंद्रांवर 2307 शेतकऱ्यांची नोंदणी
ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे अशा शेतकऱ्यांच्या तुरीची, विदर्भ कॉ-ऑप.मार्केटिंग फेडरेशन द्वारे अकोला, अकोट, मूर्तिजापूर केंद्रांवर हमीभावाने प्रत्यक्ष खरेदी केली जाणार आहे. त्यानुसार आतापर्यंत व्ही.सी.एम.एस. च्या अकोला केंद्रावर 1109, अकोट केंद्रावर 586 तर, मूर्तिजापूर केंद्रावर 612 असे, जिल्ह्यात एकूण 2307 नोंदणी झाली आहे.

‘डीएमओ’च्या एकाही केंद्राचा पत्ता नाही
जिल्हा विपणन अधिकारी यांच्या अंतर्गत एकाही हमीभाव केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात आल्याची किंवा प्रत्यक्ष तूर खरेदी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाद्वारे मिळाली नाही. त्यामुळे ‘डीएमओ’ अंतर्गत यंदा तूर खरेदी केली जाणार आहे की नाही, यावर प्रश्नचिन्न निर्माण झाले आहे.

खरेदीसाठी हेक्टरी उत्पादकता निश्चित
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत 2019-20 च्या हंगामात शासकीय केंद्रांवर हमीभावाने तूर खरेदीसाठी राज्यातील 34 जिल्ह्यांची प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यात 9.66 प्रतिहेक्टर उत्पादकता निश्चित करण्यात आली असून, निश्चित मर्यादेच्या स्वरुपात, प्रतिक्विंटल 5800 रुपये हमीभाव या दराने तूर खेरीद केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT