File photo
File photo 
विदर्भ

चांदूरबाजारात दोन एटीएम फोडले

सकाळ वृत्तसेवा

अमरावती/चांदूरबाजार : चांदूरबाजार येथे महाराष्ट्र बॅंक व बॅंक ऑफ इंडिया या दोन बॅंकांचे एटीएम चोरट्यांनी फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुटला. मोर्शी पोलिस व स्थानिक गुन्हेशाखेने या प्रकरणात सहभागी दोघांना रात्रीतूनच अटक केली. रविवारी (ता. 29) रात्री ही घटना घडली.
महेश अर्जुन मानापुरे (वय 32) व दिगंबर जगनराव लांडगे (वय 32 दोघेही रा. कोळविहीर) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून लोखंडी टॉमी, पेन्चिस, प्लॅस्टिक टेप यासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा 1 लाख 53 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. बेलोरा टी पॉइंट ते चांदूरबाजार मार्गावर हे दोन्ही एटीएम आहेत. चांदूरबाजार पोलिसांना एटीएम फोडल्याची माहिती कळताच, त्यांनी वरिष्ठांना कळविले. त्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाकडून सर्वच ठाण्याला या घटनेची माहिती देण्यात आली. त्यामुळे बहुतांश ठाण्याच्या हद्दीमध्ये पोलिसांनी रात्रीला नाकाबंदी केली. मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रपाळीत ड्यूटीवर हजर पोलिस शिपाई व होमगार्ड कर्मचारी यांनी मोर्शीच्या जयस्तंभचौकात ड्यूटीवर असताना, नमूद दोघांपैकी एकाला अटक केली. त्याने लगेच दुसऱ्याचेही नाव सांगितले. त्यामुळे गुन्हेशाखेने दुसऱ्याला कोळविहीर गावातून पकडले.
सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे
एकाच रात्री दोन एटीएम फोडल्यानंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जप्त केले. त्यात एटीएम फोडणाऱ्या दोघांच्या हालचाली टिपल्या गेल्या. ते फुटेज पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावर पाठविण्यात आले. त्यामुळे काही तासांत चोरटे सापडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : एक दंगल झाली आणि त्यामुळे जगात कामगार दिन साजरा होऊ लागला, वाचा इतिहास

Maharashtra Din 2024 : बहु असोत सुंदर संपन्न की महा..प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.! महाराष्ट्र दिनाच्या द्या हटके शुभेच्छा

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

SCROLL FOR NEXT