file photo
file photo 
विदर्भ

विजेच्या धक्‍क्‍याने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील जुगनाळा येथील शेतशिवारात सोमवारी (ता. 14) विजेच्या धक्‍क्‍याने दोघांचा मृत्यू झाला. दिनाजी तुकाराम तोंडरे (वय 52) आणि सीताबाई विठोबा दोनाडकर (वय 70) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही जुगनाळा येथील रहिवासी आहेत.
प्राप्त माहितीनुसार दिनाजी तोंडरे हे गुरांना गवत आणण्यासाठी दोनाडकर यांच्या शेतावर गेले होते. दोनाडकर यांच्या शेतातील कृषिपंपाकडे जाणाऱ्या मार्गावरील शेतात विजेची तार तुटून पडली होती. सध्या शेतात धानपीक असल्याने तार दिसली नाही. त्यामुळे दिनाजी तोंडरे यांचा स्पर्श तुटलेल्या तारेला झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळाने सीताबाई दोनाडकर याही शेतावर निंदण करण्यासाठी गेल्या. त्यांनाही तुटलेली विजेची तार दिसली नाही. त्यांचाही तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी आणि ब्रह्मपुरी पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. एकाच गावातील दोघांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Karmaveerayan: 'कर्मवीरायण' मधून उलगडणार कर्मवीर भाऊराव पाटील यांचं जीवनचरित्र; 'हा' अभिनेता साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT