देबोजित बॅनर्जी व कमलेश शहाकार
देबोजित बॅनर्जी व कमलेश शहाकार  
विदर्भ

मोहगाव तलावात बुडून दोन विमा एजंटचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा (जि. नागपूर) : तालुक्‍यातील मोहगाव (झिल्पी) तलावाजवळ पर्यटनासाठी आलेल्या दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज शनिवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. कमलेश रमेश शाहकार (वय 36, रा. कळमना, नागपूर) व देबोजित कल्याण बॅनर्जी (वय 36, रा. दुर्गावती चौक, पाचपावली, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही विमा एजंट आहेत.
शनिवारी दुपारी काही नागरिकांना तलावाच्या काठावर दोन दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आल्या, तर तलावात दोन मृतदेह तरंगताना दिसले. मोहगावच्या सरपंचांनी याची माहिती हिंगणा पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 9 वाजता दोघेही त्यांच्या दुचाकींनी हिंगणा तालुक्‍यातील मोहगाव शिवारातीला झिल्पी तलावावर आले होते. शनिवारी दुपारी बारा वाजता या परिसरातील काही लोकांना त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. दुचाकी काही अंतरावर उभ्या करण्यात आल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक नितीन कुंभार व चमू घटनास्थळी दाखल झाली व दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. त्यांच्या कपड्यात असलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटविण्यात आली व नातेवाईकांना सूचना देण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT