नागपूर : उड्डाणपुलावर उंच तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर धावताना दोन मेट्रो ट्रेन.
नागपूर : उड्डाणपुलावर उंच तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर धावताना दोन मेट्रो ट्रेन.  
विदर्भ

ट्रॅकवर धावल्या दोन मेट्रो

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सीताबर्डी इंटरचेंज ते झीरो माइल स्टेशनपर्यंत अप-डाउन अशा दोन्ही ट्रॅकवर आज दोन मेट्रो धावल्या. शहीद गोवारी उड्डाणपुलावरील ट्रॅकवर समांतर दोन मेट्रोचा प्रवास अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. यावेळी मेट्रोतून प्रवाशांच्या वजनाएवढे वाळूचे पोते ठेवण्यात आले. 340 टन वजनाच्या पोत्यांसह वजनाची चाचणी घेण्यात आली.
सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन ते झीरो माइल मेट्रो स्टेशनदरम्यान तयार ट्रॅकवर आज वजनाची चाचणी घेण्यात आली. 43 मी. स्टील कंपोझिट गर्डर येथे 100 टन इतक्‍या वाळूच्या बॅग दोन्ही ट्रेनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. तसेच 240 टन एवढ्या वजनाच्या वाळूच्या बॅग ट्रॅकवर ठेवून संरचना आणि डिझाईनच्या मापदंडानुसार तपासणी करण्यात आली. त्यामुळे आता या मार्गावर मेट्रोच्या संचालनाचा मार्ग मोकळा झाला. मागील आठवड्यात 4 जून रोजी सीताबर्डी इंटरचेंज ते झीरो माइल मेट्रो स्टेशनदरम्यान मेट्रोची चाचणी घेण्यात आली. मेट्रो ट्रेनचे क्रॉस ओव्हरपर्यंत संचालन करण्यात आले होते. अर्थात डाउन मार्गाने जाणाऱ्या ट्रेनने अप मार्गावर प्रवास केला होता. आज झालेल्या चाचणीनंतर लवकरच अप आणि डाउन ट्रॅकवर मेट्रोचा प्रवास सुरू होणार असल्याचे निश्‍चित झाले. मेट्रो ट्रेनचे परीक्षण शहीद गोवारी उड्डाणपुलावर तयार करण्यात आलेल्या स्टील कंपोझिट गर्डर येथे करण्यात आले. यावेळी दोन ट्रेन ट्रॅकवर धावल्या. उड्डाणपुलावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी दोन समांतर ट्रेनचा प्रवास उत्सुकतेने मोबाईल कॅमऱ्यात कैद केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT