Leopard
Leopard 
विदर्भ

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

खामगाव : शेतात पेरणीची कामे करीत असतांना दोन युवकांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये उमेश लयनसिंग राठोड (वय 20) व मंगेश भावराव राठोड (वय 33) हे गंभीर जखमी झाले. त्यांना खामगाव येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते; परंतु पुढील उपचारासाठी त्यांची अकोला येथे रवानगी करण्यात आली आहे. 

भालेगाव बाजार येथील रहिवासी उमेश राठोड व  मंगेश राठोड हे पोरज शिवारातील सुरेश दिवनाले यांच्या शेतात शेतीची कामे करीत असताना शेतातल्या दाट झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने उमेश राठोडवर अचानक हल्ला केला. बिबट्याने हल्ला केल्याचे पाहून मंगेश उमेशला वाचविण्यासाठी त्याच्या दिशेने त्याला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेला असता तो देखील गंभीर जखमी झाला. दोघांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. यामध्ये दोन्ही युवक गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, शेजारच्याच शेतात त्यांचे चुलत भाऊ सुपडसिंग राठोड हे देखील शेतात काम करीत होते. त्यांना ही घटना समजताच ते घटनास्थळी पोहचले व त्यांनी दोघांना खामगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले, पण पुढील उपचारासाठी त्या दोघांना अकोला येथे पाठविण्यात आले आहे.

ढोरपगाव शिवारात दोन दिवसांआधी (ता. 5) एका बिबट्याने एकनाथ मामनकर (वय 60) शेतकऱ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ते जखमी झाले होते. तसेच याच परिसरात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला होता. एकाच सप्ताहात दुसऱ्यांदा ही घटना घडली असल्याने ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात रेस्क्यु ऑपरेशन राबवून सदर बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT