Two truck accident on Tiwasa National Highway in Amravati 
विदर्भ

मागून येणाऱ्या भरधाव वाळूच्या ट्रकने दिली आयशर ट्रकला धडक; तिवसा राष्ट्रीय महामार्गावरील घटना

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : शुक्रवारी सकाळी नागपूरवरून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या आईसर ट्रकला मागून येणाऱ्या वाळूच्या ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रकने धडक दिल्याने आयशर ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. ट्रक चालक सुखरूप आहे. तर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, तिवसा शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा या मार्गावरून रोजच शेकडो ट्रकनी नागपूर मार्गे ओव्हरलोड वाळूची वाहतूक होते. सुसाट धावणाऱ्या या ट्रकमुळे अनेकदा अपघात होतात. सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तहसील जवळ नागपूरवरून ट्रक क्रमांक एम एच २७ एक्स ६१०५ माल घेऊन जात होता.

मागून येणाऱ्या एका मोठ्या वाळूच्या ट्रकने जबर धडक दिल्याने आयशर ट्रक पलटी होऊन ट्रकचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही. ट्रक चालक सुखरूप आहे. घटनास्थळी तिवसा पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून पुढील कारवाई पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वनतारा'मध्ये घेऊन गेलेल्या 'महादेवी'ला परत आणण्यासाठी ताकदीने लढा; मुनिश्री आदित्यसागर यांचे राजू शेट्टी, प्रतीक पाटलांना आवाहन

Explained: तुम्हालाही जास्त अक्रोड खाण्याची सवय आहे का? मग होऊ शकतात 'हे' दुष्परिणाम

मुंबईत मुसळधार! ट्रॅकवर पाणी, लोकल ट्रेनचं वेळापत्रक कोलमडलं; अनेक भागात साचलं पाणी

Latest Marathi News Updates : मराठा समाजानंतर आता बंजारा समाज आरक्षणासाठी आक्रमक; बीडमध्ये आज विराट मोर्चा

Showroom fire: 'साेलापूरातील सिद्धी सुझुकी अन्‌ बजाज शोरूमला भीषण आग'; धूर पाहून वॉचमनने दाखविली तत्परता, अंदाजे ३५ ते ४० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT