File photo
File photo 
विदर्भ

अंजनगावसुर्जीत दोन ट्रक सागवान जप्त

सकाळ वृत्तसेवा

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : मेळघाट प्रादेशिक वन विभाग परतवाडा अंतर्गत अंजनगाव परिक्षेत्रात येणाऱ्या सतीनियत क्षेत्रात अवैध वृक्षतोड करताना आढळून आलेल्या व्यक्तीस अटक केल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर अंजनगावसुर्जी शहरातून दोन ट्रक सागवान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अंजनगाव परिक्षेत्रात येणाऱ्या सतीनियत क्षेत्रात अवैध वृक्षतोड करणाऱ्या राजाराम लक्ष्मण यावलकर (रा. काकदरी) यास गस्तीदरम्यान अटक केल्यानंतर वनविभागाच्या कोठडीत त्याने ज्याठिकाणी माल पोहोचविला ते ठिकाण दाखवण्यास होकार दिल्याने वनविभाग व पोलिस विभाग यांनी संयुक्तरीत्या कारवाई राबवली. त्यानुसार बुधवारी (ता.25) तपासणी दरम्यान येथील कोकाटखेल परिसरात असलेल्या अजीज फर्निचर येथे तपासणी केली असता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सागवान फर्निचर आढळून आले. यावर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अजीज यांच्याशी संपर्क करून व दस्तऐवजाची संपूर्ण पाहणी करून दस्तऐवज व मालात तफावत आढळल्याने वनविभागाने संपूर्ण सागवान माल जप्त करून त्याचे वनमूल्य नोंदवून कारवाई केली. संपूर्ण माल दोन ट्रक 407 मध्ये भरून परतवाडा येथे नेण्यात आला.
अंजनगावसुर्जी तालुक्‍याचा बराच भाग हा मेळघाटला लागून असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सागवान लाकडाची तस्करी होते. याही अगोदर वनविभागाने अशाप्रकारच्या कारवाया शहरात व तालुक्‍यात केल्या आहेत. परंतु अवैध सागवान तोडीचा व्यवसाय अजूनही जोरात सुरू असल्याचे आज झालेल्या कारवाईवरून दिसून आल्याने वनविभागाने यावर बारीक लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. ही संपूर्ण कारवाई विभागीय वन अधिकारी हरिश्‍चंद्र वाघमोडे यांच्या मार्गदर्शनात मेळघाट प्रादेशिक वनविभाग अमरावती यांच्या वनअधिकारी व पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT