विदर्भ

प्रशिक्षणासाठी ‘डीटीएच’चा प्रयोग

सकाळवृत्तसेवा

नागपूर - पहिली, आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी या वर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाचा (एमएससीईआरटी) ‘व्हर्च्युअल’ प्रशिक्षणाच्या फंड्यानंतर ‘डायरेक्‍ट टू होम-टेलिव्हीजन’वरून (डीटीएच) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध ‘व्हिडिओ क्‍लीप्स’ही तयार केल्या आहेत.

दर वर्षी अभ्यासक्रमातील बदलासाठी एमएससीईआरटी प्रशिक्षणाचे आयोजन करते. मात्र, या वर्षी बराच उशीर झाला असून, पुस्तकांमध्ये चुका आढळून आल्याने प्राधिकरणाला प्रशिक्षण घेणे अशक्‍य झाले. त्यामुळे अद्यापही शिक्षकांना आठवी आणि दहावीचा अभ्यासक्रम कसा शिकवावा, याबद्दल प्रश्‍न पडला आहे. प्रशिक्षणामध्ये बराच वेळ जाणार असल्याचे निदर्शनास येताच पहिली, आठवी आणि दहावीच्या शिक्षकांना ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षणाधिकारी स्तरावर ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे सूचना देण्यात आल्यात. मात्र, सर्वसाधारण प्रशिक्षणात प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून शिक्षक आपल्या संकल्पना व पडणाऱ्या प्रश्‍नांची उकल करून घेत होते. ‘व्हर्च्युअल’ प्रशिक्षण एकतर्फी असल्याने त्याचा फायदा झाला नसल्याचे समजते. राज्यात ६३ हजार शाळा डिजिटल झाल्या आहेत. या शाळांमध्ये ॲपच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटांपूर्वी शिक्षकांना कळविण्यात येईल. यासाठी शाळेला डीटीएच, माईक आणि इंटर्व्हटरची सुविधा करावी लागणार आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांकडून मदत घेण्याचे आवाहन एमएससीईआरटीकडून करण्यात आले आहे.  

जिओ टीव्हीचे ॲप
डीटीएचमार्फत प्रशिक्षण देताना, प्रत्येक शिक्षकाला ‘जिओ टीव्ही ॲप’ डाउनलोड करावे, असे निर्देश एमएससीईआरटीई कडून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकाला मोबाईलमध्ये ते डाउनलोड करावे लागणार आहे. ते सुरू करून शिक्षकांना व्हिडिओ बघता येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT