File photo
File photo 
विदर्भ

नवऱ्यासोबत राहून शेजाऱ्याला एसएमएस : वसंत पुरके

सकाळवृत्तसेवा

नागपूर : जनतेला दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता होत नसल्याने राजीनामा देणारे नाना पटोले यांची स्तुती करीत सत्तेतील काहींचे राजीनामे फाटल्याचा टोला माजी मंत्री वसंत पुरके यांनी शिवसेनेला लगावला. नवऱ्यासोबत राहून शेजाऱ्याला मी तुमचीच, असा एसएमएस केला जात असल्याचे नमूद करीत त्यांनी सेनेवर दुसरा प्रहार करताना सभागृहात हशा पिकला.
बहुजन विचार मंचतर्फे रेशीमबागेतील सुरेश भट सभागृहात आयोजित नाना पटोले व खासदार मधुकर कुकडे यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील केदार यांचाही बंडखोर व्यक्तिमत्त्व असल्याचा उल्लेख केला. माजी मंत्री पुरके यांनी प्रारब्धवादाचा लाभ घेऊन सत्तेत आलेल्यांपासून सावध राहण्याचा सल्ला जनतेला दिला. सत्ताधाऱ्यांची सर्वांत आधी गोंदिया-भंडारा मतदारसंघाने जिरवली. ही सुरुवात असून नागपूर ते संपूर्ण देशात असेच चित्र निर्माण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सध्या लोकशाहीचा मुडदा पाडला जात असून मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियाचा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला. मात्र, जनता बेसावध राहिल्याने हे घडल्याचेही ते म्हणाले. यावेळी खासदार ताम्रध्वज शाहू यांनी कॉंग्रेसने देशाला सर्वधर्मसमभाव तसेच लोकशाही नांदविणारे संविधान भारताला देऊन मोठे कार्य केल्याचे सांगितले. देशातील मुलींचा सन्मान राखण्यासाठी मुलांवर संस्कार आवश्‍यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार केदार यांनी अध्यक्षीय भाषणातून बहुजनांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. सरकारने बहुजनांची आर्थिक, सामाजिक कोंडी केल्याचा आरोप त्यांनी केला.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्यास सत्ताबदल : अनिल देशमुख
भंडारा-गोंदियात कॉंग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याने विजय शक्‍य झाला. हा एकजुटीचा विजय असून, एकत्र ताकद लावल्यास राज्य व केंद्रातही सत्ताबदल होईल, असा विश्‍वास माजी मंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केला. रुंघण्याचा हिसका दाखविल्याशिवाय सरकार बाहेर होणार नाही, असे नमूद करीत त्यांनी शेतकऱ्यांना सरकार खाली खेचण्यासाठी आवाहन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT