विदर्भ

आता शेतकऱ्यांनी एक तोंडी तक्रार कृषी केंद्रांना पडणार भारी

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : पाऊस येताच युरिया खताच्या (Urea fertilizer) मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासून काही ठिकाणी युरियाचा कृत्रिम तुटवडा (Artificial scarcity of urea) तयार केला जात आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनंतर जादा दराने विक्री केल्याची तोंडी तक्रारही शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे केल्यास कृषी केंद्रचालकांना ती भारी पडण्याची शक्यता आहे. (Verbal-complaints-of-farmers-will-be-heavy-on-agricultural-centers)

जिल्ह्यात खरिपाची पेरणी ६० टक्क्यांवर थांबली आहे. पावसामुळे पेरणीचा वेग मंदावला असला तरी आता शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. सध्या पावसाने उसंत घेतल्याने युरियाची मागणी कमी आहे. चांगला पाऊस येताच युरियाच्या मागणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात युरियाचा तुटवडा नाही. मूबलक प्रमाणात युरिया असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. असे असले तरी आतापासून युरियाचा तुटवडा असल्यासारखी स्थिती तयार केली जात आहे.

तुटवडा दाखवून शेतकऱ्यांना जास्त रक्कमेत युरिया विकण्याची काहींनी शक्कल लढविली आहे. मात्र, ही शक्कल अनेकांना भारी पडण्याची शक्यता आहे. कृषी सेवा केंद्र चालकांना जादा दराने विक्री केल्याची तोंडी तक्रारही अडचणी आणणारी ठरणार आहे. कृषी विभागाकडे तशी तक्रार आल्यास संबंधित कृषी केंद्र चालकावर थेट कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे युरियाचा काळाबाजार करून ‘लिंकिंग’ करणाऱ्यांना चाप बसण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता खतांची गरज आहे. बाजारात खतांचा तुटवडा नसला तरी जादा दराने विक्री सुरू झाली आहे. त्यामुळेच कृषी विभाग सक्रिय झाला आहे.

सहा हजार मेट्रिक टनाचा बंफर स्टॉक

युरियाची मागणी वाढल्यानंतर बाजारात युरियाचा तुटवडा निर्माण झाल्यास अशास्थितीसाठी जिल्ह्यात सहा हजार मेट्रिक टनाचा बंफर स्टॉक ठेवण्यात आला आहे. अत्यंत आणीबाणीच्या काळात शेतकऱ्यांना हा युरिया उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जादा दराने युरिया घेऊन ठेवू नये, शेतकऱ्यांना आवश्यक तेवढा युरिया असल्याचे आवाहन कृषी विभागाकडून केले जात आहे.

(Verbal-complaints-of-farmers-will-be-heavy-on-agricultural-centers)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT