a vertical car took the belly!
a vertical car took the belly! 
विदर्भ

उभ्या कारने घेतला पेट!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : रस्त्यावर उभ्या असलेल्या एका महागड्या कारने पेटला घेतला. लागलेल्या या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली. ही घटना बुधवारी (ता.20) रात्री नऊ वाजता दरम्यान अकोटफैल पुलावर घडली.

घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली. अकोटफैल पुलावर रात्री नऊ वाजता दरम्यान एम.एच.15, सीटी 1379 क्रमांकाच्या उभ्या कारने पेटला घेतला. कारमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच आतमध्ये बसलेल्या तिघांनी जीवाच्या आकांताने पळ काढला. कार जळत असल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी अग्नीशमन विभागाला संपर्क केला. घटनेची माहिती मिळतातच अग्नीशमन विभागाने क्षणांचाही विलंब न करता एम.एच.30 एच 5225 क्रमांकाचे वाहन घटनास्थळी पाठविले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.
कारला आग लागल्याच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती.

यंत्रणा घटनास्थळी
 कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणुन अकोटफैल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अणे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. जळालेली कार ही मयुर मोहिते नामक व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती असून, आग कशामुळे लागली याचा खुलासा वृत्त लिहिस्तोर झाला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT