विदर्भ

कर्जमाफीची माहिती देणारी ‘लिंक’ हटविली

संदीप रायपुरे

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) - शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकार आणि विरोधकांचे दावे-प्रतिदावे सुरू आहेत. अशातच शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जमाफीची माहिती देण्यासाठी ‘आपले सरकार’ या पोर्टलवर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे संकेतस्थळ उघडण्यात आले. यावर कर्जमाफीची स्थिती जाणून घेण्यासाठी दोन स्वतंत्र ‘लिंक’ देण्यात आल्या होत्या. मात्र ‘त्या’ बंद करण्यात आल्याने हेल्पलाइन क्रमांकही गायब झाला आहे. त्यामुळे कर्जमाफीची माहिती सरकार लपवीत आहे, अशी टीका शेतकऱ्यांनी केली आहे.

 राज्यात कर्जमाफीची घोषणा झाली. अतिशय कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेत. त्यानंतरसुद्धा त्यांच्या पदरी निराशाच पडली. कर्जमाफीसंदर्भात सातत्याने होत असणारे बदल, प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकऱ्यांची दर्शविलेली कर्जमाफी, असा गोंधळ सुरू झाला आहे. 

राज्य शासनाच्या ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलवर शेतकरी कर्जमाफीसदंर्भात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे स्वतंत्र संकेतस्थळ उघडण्यात आले. या संकेतस्थळावर उजव्या बाजूला आणखी दोन वेगळ्या लिंक देण्यात आल्या होत्या. त्यातून अर्ज भरतेवेळी शेतकऱ्याला मिळालेला आयडी टाकून आपल्या कर्जमाफीची माहिती मिळणार होती. काही दिवसांपर्यंत या लिंक सुरू होत्या. आता या दोन्ही लिंक हटविण्यात आल्या आहेत. संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांकसुद्धा गायब झाला आहे. 

शेतकरी कर्जमाफीचे संकेतस्थळ उघडल्यानंतर कर्जमाफी वितरण, नियंत्रण यंत्रणा अशाप्रकारचा संदेश आहे. त्याखाली ‘युजरनेम’ व ‘पासवर्ड’चे रकाने आहेत. सुरुवातीच्या दोन्ही लिंक हटविल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. आपली आयडी टाकून कर्जमाफीची स्थिती बघण्याचा प्रयत्न करीत आहेत. संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांक हटविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT