Nagpur-mahanagar
Nagpur-mahanagar 
विदर्भ

Vidhansabha 2019 : लढण्यापेक्षा जाणार कोण, याचीच चर्चा

राजेश चरपे

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये लढणार कोण, यापेक्षा भाजपमध्ये जाणार कोण, याचीच अधिक चर्चा नागपूर महानगरात आहे. दुसरीकडे, मागील विधानसभा निवडणुकीत विजयी षटकार खेचणाऱ्या भाजपला यंदाही कुठलीच रिस्क घ्यायची नसली, तरी काही बनचुकेपणा करणाऱ्या आमदारांना डच्चू देणार असल्याच्या वार्तेने अनेकांची धाकधूक वाढली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. रोज बड्या बड्या नेत्यांचे प्रवेश होत आहेत, त्यामुळे काँग्रेस चांगलीच धास्तावली आहे, कार्यकर्ते सैरभैर आहेत. मात्र, आजच्या परिस्थितीत काँग्रेसतर्फे शहराध्यक्ष विकास ठाकरे पश्‍चिम नागपूर, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल गुडधे दक्षिण-पश्‍चिम, विशाल मुत्तेमवार दक्षिण नागपूर, अभिजित वंजारी पूर्व नागपूर, नितीन राऊत उत्तर नागपूर, अनिस अहमद मध्य नागपूर हेच उमेदवार राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्‍चिम नागपूरमधून आपणच लढणार असल्याचे जाहीर करून वेगवेगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ते मुंबईतून आणि त्यांच्या मतदारसंघातून संदीप जोशी लढणार, अशी चर्चा वर्षभरापासून होती. आमदार सुधाकर देशमुख यांनी सलग दोनदा भाजपला पश्‍चिम जिंकून दिले. मात्र, पश्‍चिम नागपूरचा उमेदवार अद्यापही ठरला नाही, असे भाजपचेच पदाधिकारी खासगीत सांगतात. येथे काँग्रेसमधून उमेदवार आयात केला जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दक्षिण नागपूरमध्ये माजी आमदार मोहन मते यांनी कार्यक्रमांचा धडका लावला आहे. ते काहीच स्पष्ट बोलत नसले, तरी त्यांना पक्षाने संकेत दिल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे, मतदारसंघाला पुरेसा वेळ देण्यासाठी येथील आमदार सुधाकर कोहळे यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचा दावा केला जात आहे.

प्रवीण दटके यांची मध्य नागपूरमधून लढण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यांनी यापूर्वीसुद्धा तिकीट मागितले होते. आता शहराध्यक्ष करून त्यांचे हात बळकट केल्याचे बोलले जाते. उत्तर नागपूरमध्ये आमदार असतानाही भाजपला अद्याप आपला जम बसवता आलेला नाही. लोकसभेच्या मतांवरून हे दिसून येते. डॉ. मिलिंद माने काँग्रेस-बसपच्या मतविभाजनामुळे निवडून आले होते. त्यात बसपच्या उमेदवाराची मोठी भूमिका होती. हा फॉर्म्युला या वेळी किती उपयोगी पडतो, हे दिसूनच येणार आहे. लोकसभेत गडकरी यांना सर्वाधिक मताधिक्‍य मिळवून देणारे पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

SCROLL FOR NEXT