Satish-and-Nitin
Satish-and-Nitin 
विदर्भ

मुत्तेमवार विरोधक दिल्लीला रवाना

सकाळवृत्तसेवा

नागपूर - माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्या विरोधातील काँग्रेसचा गट सोमवारी राजधानी एक्‍स्प्रेसने दिल्लीला रवाना झाला आहे. दिल्लीत ते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत समर्थक सुमारे दीडशे कार्यकर्त्यांचा यात समावेश आहे. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी विलास मुत्तेमवार यांच्याऐवजी नव्या उमेदवारास उमेदवारी द्यावी तसेच शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याने विकास ठाकरे यांना हटवण्यात यावे अशी मागणी नेत्यांकडे करण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मुत्तेमवार समर्थकांनी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात दिल्लीत धडक दिली होती. मुत्तेमवार हेच कसे योग्य उमेदवार आहे आणि लोकसभेची उमेदवारी देताना आम्हाला विश्‍वासात घ्यावे अशी जोरदार  मागणी त्यांनी केली होती. या दरम्यान एकूण १४ शहरांचे काँग्रेसचे अध्यक्ष बदलण्यात आले. मात्र त्यात विकास ठाकरे यांचे अध्यक्षपद कायम राहिले. त्यामुळे मुत्तेमवार समर्थकांचा दिल्ली दौरा यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. 

त्यास प्रत्युत्तर देण्यासाठी चतुर्वेदी-राऊत समर्थक दिल्लीला रवाना झाले असून आपली बाजू बळकट करणार आहेत. या गटातर्फे प्रफुल्ल गुडधे  यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी रेटल्या जाणार असल्याचे कळते. दीड-दोन वर्षांपासून काँग्रेस दोन गटांत विभाजित झाली आहे. 

मुत्तेमवार विरोधक दिल्लीला रवाना
एकमेकांच्या विरोधात बंडखोरी आणि पाडापाडीचे राजकारण केल्याने महापालिकेच्या निवडणुकीत फक्त १८ नगरसेवक निवडून आले. त्यानंतरही काँग्रेसमधील भांडणे थांबली नाहीत. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण फक्त मुत्तेमवार गटांचेच ऐकत असल्याने त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसमधील बंडाळी पुन्हा उफाळून आली आल्याने काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते चिंतित पडले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT