अर्जुनी मोरगाव : गावकऱ्यांशी चर्चा करताना तहसीलदार विनोद मेश्राम. 
अर्जुनी मोरगाव : गावकऱ्यांशी चर्चा करताना तहसीलदार विनोद मेश्राम.  
विदर्भ

गावकऱ्यांचा निवडणुकीवर बहिष्कारचा निर्णय मागे 

सकाळ वृत्तसेवा

अर्जुनी मोरगाव : धानशेतीला सिंचनासाठी 24 तास वीजपुरवठा देण्यात यावा, यासह अन्य मागण्यांची पूर्तता न झाल्याने तालुक्‍यातील पाच गावांतील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. तसे बॅनरही लावले होते. दरम्यान, निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली, तशी प्रशासनाची चिंता वाढत होती. त्यामुळे तहसीलदारांनी ही बाब गंभीर घेत गुरुवारी (ता. 17) संबंधित गावांमध्ये जाऊन गावकऱ्यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या समस्यांबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून त्या सोडविण्याचे आश्‍वासन दिले. त्यामुळे गावकऱ्यांनी निवडणुकीवरील बहिष्कार टाकण्याचा निर्णय मागे घेतला आहे. 
तालुक्‍यातील पुष्पनगर अ, पुष्पनगर ब, खोळंदा, वडेगाव, बंध्या या पाच गावांतील धान उत्पादक शेतकरी धानशेतीवरच अवलंबून आहेत. या परिसरात तलाव, बोड्यांची व्यवस्था नसल्याने व ही गावे गाढवी नदीच्या तिरावर वसली असल्याने इटियाडोह धरणाच्या वेस्टेज पाण्याने विद्युतपंपाच्या साहाय्याने शेतकरी धानपीक घेतात. यापूर्वी परिसरात 24 तास वीजपुरवठा सुरू होता. मात्र मे, जूनपासून वीज विभागाने गावासाठी आणि शेतीसाठी वीज वेगळी केल्याने गावासाठी 24 तास व शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा सुरू केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. 
धानाला मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने आठ तास वीजपुरवठा शक्‍य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यातही आठ तास वीज ही रात्री-बेरात्री दिली जात असल्याने शेतकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. सध्या धानाचे उत्पन्न निघण्याच्या मार्गावर असताना भारनियमनाने हाती आलेले पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. तेव्हा कमीतकमी एक महिनातरी 24 तास वीजपुरवठा देण्यात यावा, अशी मागणी या पाच गावांतील नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला केली होती. मात्र, शेतकऱ्यांचे गोडवे गाणाऱ्या लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. कोण्याही उमेदवारांनी समस्यांचे निराकरण केल्याशिवाय गावात येऊ नये, असे बॅनरसुद्धा लावले. दरम्यान, तालुका प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेतली. तहसीलदार विनोद मेश्राम यांनी निवडणुकीवर बहिष्कार असणाऱ्या पुष्पनगर अ व ब, वडेगाव, बंध्या, खोळंदा या गावातील नागरिकांची भेट घेतली. बैठक बोलावून गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानुसार, समस्यांची गंभीर दखल घेऊन त्यांनी मागण्यांचे निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब पाठविण्याचे आणि समस्या निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. यावर गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय मागे घेऊन मतदान करणार असल्याचे सांगितले. बैठकीला तहसीलदार विनोद मेश्राम यांच्यासोबत केशोरीचे ठाणेदार जाधव, इटियाडोहचे लंजे, वीज विभागाचे राऊत, मेश्राम व अन्य कर्मचारी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

'यशवंत'ची 300 एकर जमीन 56 कोटींना विकून संजय पाटलांनी मालमत्ता कमावली; विशाल पाटलांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT