The Wall X app feature in a mobile display
The Wall X app feature in a mobile display 
विदर्भ

'वॉल एक्स' अॅप ने सजवा मोबाईलचा डिस्प्ले

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ - यवतमाळच्या तरुणाने मोबाईलचा डिस्प्ले सजविण्यासाठी वॉल एक्स नावाची अॅप तयार केली आहे. ही अॅप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्यास आता तुम्ही सुध्दा आपला मोबाईल सुंदर, आकर्षक आणि देखणा बनवू शकता. या अॅप चे आता सर्वदुर कौतुक केल्या जात आहे.

सुंदर, आकर्षक, देखण्या वस्तुंचे मनुष्याला नेहमीच अप्रुप वाटत आले आहे. त्यामुळे मनुष्याच्या मनाला समाधान मिळते यात शंका नाही. सध्या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या मोबाईलला सुध्दा सजविण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. आपला मोबाईल चांगला दिसावा म्हणून वेगवेगळी रंगबेरंगी बॅक कव्हर बाजारात उपलब्ध झाली आहे. आता मोबाईल चा डिस्प्ले आकर्षक दिसावा म्हणून यवतमाळच्या जगदंबा अभियांत्रीकी महाविद्यालयाचा संगणक विभागाचा पास आऊट विद्यार्थी ईशान भागवते या तरुणाने वॉल एक्स नावाचे अॅप तयार केले आहे. या अॅप मध्ये 11 कॅटेगीरी असून त्यामध्ये पाचशे पेक्षाही जास्त वॉलपेपर्स अपलोड करण्यात आले आहे. लॉकस्क्रिन तसेच होमस्क्रिन असे दोन्ही प्रकारचे वॉलपेपर आपण या अॅपच्या माध्यमातून सेट करु शकणार आहोत.

विशेष म्हणजे या अॅप मध्ये सातत्याने नविन वॉलपेपर अपलोड करण्यात येणार आहे. सदर अॅप ऑप्टीमाईज केलेली असल्यामुळे बॅटरीचे कन्झम्शन होत नाही. तसेच मोबाईलच्या बॅक ग्राऊंड मध्ये ती सुरु राहत नाही. ही अॅप व्यावसाईकता नजरेसमोर न ठेवता तयार करण्यात आली आहे. त्यामुळे अत्यल्प जाहीरात यामध्ये दिसणार आहे.

गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध -
वॉल एक्स अॅप आता गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध झाली आहे. बी टु एक्स या डेव्हलपर आयडी ने  अॅप अपलोड करण्यात आली आहे. अॅन्ड्रॉईड ऑपरेटींग सिस्टीम असलेल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड केल्या जाऊ शकनार आहे. या अॅपमध्ये कम्युनिटी पेज तयार करण्यात आले असून तेथे आपण फोटो, दुसरे वॉलपेपर अपलोड अथवा शेअर करु शकणार आहात.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT