Water
Water 
विदर्भ

१० जूनपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

सकाळवृत्तसेवा

नागपूर - सध्या शहराला १० जूनपर्यंत पाणीपुरवठा करता येणार एवढाच साठा शिल्लक राहिला आहे. प्रत्येकाला पुरेसे पाणी मिळावे याकरिता महापालिकेने उद्या गुरुवारपासून टुल्लूपंपाने अतिरिक्त पाणी खेचून घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. 

पिण्याचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी आज मुख्यालयात या संदर्भात बैठक घेतली. स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यासह जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, मनपातील सत्तापक्ष उपनेते बाल्या बोरकर, वर्षा ठाकरे, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे आदी या बैठकीला उपस्थित होते. 

बैठकीत पाटबंधारे विभागाने बंधाऱ्यांमध्ये असलेल्या पाण्याच्या उपलब्धतेसंदर्भात माहिती दिली. पाटबंधारे विभागातर्फे नागपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा केंद्राला देण्यात येणारे पाणी जेवढे देण्यात येते तेवढे पोचत नाही. त्याची कारणे शोधण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले. २० मेपासून अनधिकृत नळजोडण्या नियमित करण्याची मोहीम सुरू होत आहे. नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन नळजोडण्या नियमित कराव्यात. मोहिमेदरम्यान पुढाकार न घेणाऱ्या नागरिकांच्या घरात जर अनधिकृत जोडणी आढळून आली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 

आवश्‍यकता भासल्यास पोलिसांची मदतही घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. चौराई धरणातून पाणी सोडण्यासंदर्भात मध्य प्रदेश शासनाशी बोलावे, अशी विनंतीही राज्य शासनाला करण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाने अतिरिक्त क्‍युसेक्‍स पाणी द्यावे, यासाठीही  प्रयत्न सुरू आहेत. आवश्‍यकता भासल्यास प्रकल्पातील मृत जलसाठा वापरण्यासाठी प्रशासनाने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने त्यालाही मंजुरी दिल्याची माहिती यावेळी आयुक्त बांगर यांनी उपस्थितांना दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT