file photo
file photo 
विदर्भ

चंद्रपूर वीज केंद्रात शस्त्रधारींचा शिरकाव?

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्राच्या हिराई विश्रामगृह परिसरातील नाल्याजवळून काळ्या रंगाचा गणवेश परिधान केले पाच ते सहा शस्त्रधारी गेल्याची माहिती सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर बुधवारी (ता. 21) दुर्गापूर पोलिस आणि केंद्राच्या सुरक्षारक्षकांनी दिवसभर तपास मोहीम राबविली. मात्र, त्यांच्या हातात काहीच पडले नाही.
दुर्गापूरलगतच्या नेरी येथील बिसेन मंगळवारी पडोली येथे कामानिमित्त गेले होते. रात्री 11 वाजताच्या सुमारास ते वीज केंद्र परिसरातील रस्त्याने गावाकडे जात होते. यावेळी त्यांना हिराई विश्रामगृह परिसरातील नाल्याजवळून पाच ते सहा शस्त्रधारी रस्ता ओलांडत असल्याचे आढळून आले. या सर्वांनी काळ्या रंगाचा गणवेश परिधान केला होता. त्यामुळे या सर्वांवर संशय आल्याने बिसेन यांनी वीज केंद्राच्या सुरक्षा विभागाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर दुर्गापूर पोलिसांना कळविण्यात आले. मात्र, रात्रीची वेळ असल्याने शोध घेता आला नाही. मंगळवारी ही शोध मोहीम राबविली. मात्र, कोणीही आढळले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

SCROLL FOR NEXT