विदर्भ

पत्नीवर बळजबरी, पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : व्यवसाय करण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी पत्नीला मारहाण करून बळजबरी लैंगिक शोषण करणाऱ्या पतीविरुद्ध पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तसेच शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या सासू-सासऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तहसील परिसरात राहणारी पीडित महिलेचे आरोपी रितीन अमृतलाल शाहू याच्याशी 2012 मध्ये लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर रितीनला व्यवसाय थाटायचा होता. त्यामुळे तो पत्नीला माहेरून पैसे आणण्यासाठी दबाव टाकत होता. तसेच तिला बेदम मारहाण करीत होता. सासू सावित्रीदेवी अमृतलाल शाहू, सासरा अमृतलाल शाहू, मुलगी सोनू शाहू, प्रीती शाहू यांनी पीडित महिलेकडून माहेरून सोने व पैसे आणण्यास सांगितले. तसेच दोन लाख रुपये आतापर्यंत तिच्या वडिलाकडून उकळले. 25 फेब्रुवारी ते ऑगस्ट 2012 या दरम्यान पती रितीनने पीडितेशी क्रूर वागणूक देत शारीरिक छळ करीत तिच्यावर बलात्कार केला. महिलेच्या तक्रारीवरून पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT