File photo
File photo 
विदर्भ

शीतलहर कायम

सकाळवृत्तसेवा

नागपूर : तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेली थंडीची तीव्र लाट शुक्रवारीही कायम राहिली. उपराजधानीत लागोपाठ तिसऱ्या दिवशी पाऱ्यात घसरण होऊन, या मोसमातील आणखी एका नीचांकाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली.
उत्तर भारतातील श्रीनगर, पहलगाम, शिमला, मनाली, मसुरीसह अन्य भागांमध्ये सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे विदर्भात सध्या कडाक्‍याची शीतलहर पसरली आहे. थंडीचा सर्वाधिक फटका नागपूरकरांना बसतो आहे. उपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी पाऱ्यात घसरण होऊन नीचांकाची नोंद झाली. शुक्रवारी नोंदविण्यात आलेले 8.3 अंश सेल्सिअस इतके तापमान या मोसमातील आणि विदर्भातीलही नीचांकी ठरले. गेल्या पाच दिवसांत नागपूरचा पारा तब्बल सात अंशांनी घसरला, हे उल्लेखनीय. यवतमाळ येथेही थंडीचा कहर जाणवला. येथे पारा आणखी घसरून 8.4 अंशांवर आला. इतरही जिल्ह्यांमध्ये थंडीचा प्रकोप दिसून आला. विदर्भाशेजारील मध्य प्रदेशातही थंडीची तीव्र लाट पसरली आहे. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या पचमढी येथे पाऱ्याची चक्‍क शून्य डिग्रीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. गुरुवारच्या तुलनेत येथे पारा एका अंशाने घसरून 1.0 अंशावर आला. असाच गारठा कायम राहिल्यास येथे पाण्याचा बर्फ तयार होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. विदर्भात थंडीचा कहर आणखी दोन-तीन दिवस राहणार आहे. पुढील आठवड्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्‍यता असल्यामुळे तापमानात वाढ अपेक्षित आहे. तसे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले.
असा घसरला नागपूरचा पारा
(अंश सेल्सिअसमध्ये)
वार तापमान
सोमवार 15.6
मंगळवार 15.0
बुधवार 9.6
गुरुवार 8.6
शुक्रवार 8.3

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT