Woman-Fighting
Woman-Fighting 
विदर्भ

भाजप नेत्याच्या प्रेयसीला पत्नीने झोडपले

सकाळवृत्तसेवा

नागपूर - उत्तर नागपुरातील भाजप नेत्याची प्रेयसी घरी येताच पत्नीचा पारा भडकला. तिने महिलेच्या झिंज्या पकडून मारहाण केली. पतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही झाडूचे फटके दिले. हे प्रकरण शुक्रवारी जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आले.

भाजपचा मोठा पदाधिकारी जरीपटका परिसरात पत्नीसह राहतो. त्याची प्रेयसीसुद्धा याच वस्तीत राहते. काही वर्षांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. दोघांच्याही प्रेमप्रकरणाची वस्तीभर चर्चा होती. शुक्रवारी दुपारी चार वाजता नेता घरी मित्रासह पार्टी करीत होता. त्याने प्रेयसीला फोन करून घरी बोलावले. लगबगीने प्रेयसी पोहचली. तासाभरात बाहेर गेलेली पत्नी घरी परतली. पती आणि प्रेयसीला बेडरूममध्ये पाहताच तिचा पारा चढला. तिने पतीच्या प्रेयसीचे केस पकडून बाहेर काढले. रस्त्यावर आणून चांगला चोप दिला.

प्रेयसीला मार खाताना बघून पतीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तिने घरातील झाडू आणत पती व प्रेयसीची धुलाई सुरू केली. प्रेयसीनेही धडपड करीत स्वतःची सुटका केली आणि पळ काढला. त्यापूर्वी प्रेयसीला मारण्यासाठी पत्नीला मदत केल्याचा आरोप करीत प्रेयसीने राजकीय नेत्याच्या कानाखाली वाजवली. हा प्रकार भररस्त्यावर सुरू असल्यामुळे अनेकांची गर्दी जमली. शेवटी हे प्रकरण जरीपटका पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी दोन्ही महिलांची तक्रार ऐकून घेत एनसी दाखल केली.

प्रेयसीला पुन्हा बसला मार
राजकीय नेत्याच्या पत्नीने केलेल्या मारहाणीत प्रेयसीच्या बोटातील सोन्याची महागडी अंगठी पडली. पोलिस ठाण्यात पोहचल्यानंतर तिने महिला पोलिस कर्मचाऱ्याला ही बाब सांगितली. अंगठी शोधण्यासाठी ती पुन्हा नेत्याची घरी गेली. पत्नीला ती दिसली. तिने चप्पल काढून पुन्हा मारहाण केली. त्यामुळे ती पोलिस कर्मचाऱ्याला तिथेच सोडून पळायला लागली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT