file photo
file photo 
विदर्भ

फवारणीदरम्यान शेतात महिलेला विषबाधा

सकाळ वृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : शेतात फवारणी सुरू असताना कचरा वेचत असलेल्या महिलेला विषबाधा झाली. ही घटना तालुक्‍यातील कृष्णानपूर येथे घडली. दरम्यान, शुक्रवारी (ता. पाच) विषबाधित महिलेला उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुनीता बाबाराव आसूटकर (वय 45) असे बाधित महिलेचे नाव आहे.
गेल्या 2017 मध्ये कीटकनाशकांच्या फवारणीमुळे शेतकरी व शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता; तर शेकडो बाधित झाले होते. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली. मात्र, आता पेरणीच्या सुरुवातीला शेतात काम करणाऱ्या महिलेला विषबाधा झाल्याचे समोर येताच प्रशासनात खळबळ उडाली आहे. शेतात फवारणी करताना कोणतेही सुरक्षाकिट न वापरता फवारणी करणाऱ्याला विषबाधा झाल्यास शेतमालकाला जबाबदार धरण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विषबाधेवर नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आले होते. गेल्या वर्षी विषबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात विशेष कक्ष स्थापन करून तज्ज्ञ डॉक्‍टरांकडून उपचार करण्यात आले. कृष्णानपूर येथील सुनीता आसुटकर या महिलेकडे दोन एकर शेती आहे. आठ महिन्यांपूर्वी तिच्या पतीने विष पिऊन आत्महत्या केल्याने शेतीची जबाबदारी महिलेवर आली आहे. गुरुवारी (ता.चार) मजूर लावून पिकांवर फवारणी करण्यात आली. फवारणी सुरू असताना महिला शेतात असलेला कचरा वेचत होती. तिला जळजळ होत असल्याने शुक्रवारी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT