File photo
File photo 
विदर्भ

महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी

सकाळवृत्तसेवा

महिला पोलिस कर्मचाऱ्याची दबंगगिरी
नागपूर : रेल्वे तिकीट बुकिंगच्या कार्यालयात घुसून एजंटला मारहाण करीत गल्ल्यातील 50 हजार रुपये हिसकावल्याप्रकरणी शहर पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्यासह तिच्या आई आणि बहिणीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आयशा शेख असे आरोपी महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानकापूर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलिस शिपाई आयशा शेख हिने पुण्याला जाण्यासाठी रेल्वे तिकीट बुकिंग करायची होती. त्यासाठी ती शनिवारी दुपारी मानकापुरातील कुणाल हॉस्प्टिलमसमोर असलेल्या "6-टेन' नावाच्या कार्यालयात गेली होती. तिने 1,700 रुपयांची रेल्वेची तिकीट बूक करण्यासाठी एटीएम कार्ड स्वॅप केले. त्यानंतर ती घरी पोहोचली. दरम्यान, तिच्या मोबाईलवर 15 हजार रुपये डेबिट झाल्याचा मॅसेज आला. त्यामुळे ती आई, बहीण आणि अन्य नातेवाइकांसह एजेंटच्या कार्यालयात पोहोचली. त्याच्यावर 15 हजार रुपये अतिरिक्‍त काढल्याचा आरोप केला. त्यामुळे एजेंट आणि आयशा यांच्यात "तू-तू-मैं-मैं' झाली. त्यानंतर मात्र आयशाने जोरदार भांडण करीत एजेंट पुष्पेंद्र सिंह पशुपतिनाथ सिंह (रा. जयहिंदनगर) यांच्या डोक्‍यावर डीओची बाटली मारून जखमी केले. पैशाची मागणी केली. मात्र, पुष्पेंद्र सिंह यांनी पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे आयशाने पुष्पेंद्र यांच्या काउंटरमधून 500 रुपयांच्या नोटेचे बंडल बळजबरीने हिसकावले. या प्रकरणी पुष्पेंद्र यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी शनिवारी रात्री साडेदहाला गुन्हा दाखल केला. एका सामाजिक संघटनेच्या आठ ते दहा तरुणांनी पोलिसांवर दबाव टाकून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे.
महिला पोलिसानेही दिली तक्रार
पुष्पेंद्र सिंह आणि कार्यालयातील स्टाफने शिवीगाळ तसेच कोंडून ठेवल्याचा तक्रारअर्ज महिला पोलिस आयशा शेखने मानकापूर पोलिस ठाण्यात दिला. पोलिस निरीक्षकाने अर्जावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. एजेंटने मारहाण केल्याचा आरोपही महिला पोलिसाने केला आहे.
पोलिस खात्याची प्रतिमा मलिन
पोलिसांची भ्रष्टाचार आणि लाचखाऊ वृत्ती असल्याचा नेहमी आरोप केला जातो. त्यातही वाहतूक पोलिसांची रोजची लूटमार सुरू असते. यातच आता पोलिस कर्मचारी दुकानात जाऊन गल्ल्यातून पैसे हिसकावून नेत असल्यामुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियातून खाकी वर्दीवर शिंतोडे उडविण्यात येत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT