आरमोरी : जंगलातील मोहसडव्यासह विहीरगावच्या महिला.
आरमोरी : जंगलातील मोहसडव्यासह विहीरगावच्या महिला. 
विदर्भ

विहीरगावच्या महिलांनी नष्ट केला जंगलातील मोहसडवा

सकाळ वृत्तसेवा

आरमोरी (गडचिरोली) : तालुक्‍यातील सिर्सी ग्रामपंचायतीअंतर्गत येत असलेल्या विहीरगावनजीकच्या जंगलात लपवून ठेवलेला सुमारे एक लाखाचा मोहसडवा विहीरगावच्या महिलांनी नष्ट केला. जमिनीत पुरून ठेवलेले सडव्याचे 14 ड्रम आणि 5 मडके बाहेर काढत मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी ते नष्ट केले.
सिर्सी या ग्रामपंचायतीअंतर्गत आठ गावे येतात. यातील नरोटी माल, नरोटी चक आणि गणेशपूर (2) या गावांमध्ये दारूविक्री बंद आहे. पण, विहीरगाव कुकडी, मोहटोला, गणेशपूर (1) व सिर्सी या गावांमध्ये दारूविक्री सुरू आहे. विशेष म्हणजे विहीरगावपासून काही अंतरावर असलेल्या कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावांमध्ये गाव संघटनांनी दारूविक्री बंद केली आहे. पण, येथील तब्बल 10 विक्रेत्यांनी विहीरगावच्या जंगलात दारू गाळण्याचे अड्डे सुरू केले आहेत. येथून आसपासच्या गावांमध्ये नेऊन दारू विकली जात आहे. याचा त्रास विहीरगावच्या लोकांना होतो. काहीच दिवसांपूर्वी विहीरगाव येथे मुक्तिपथ गाव संघटना पुनर्गठित करण्यात आली. यानंतर झालेल्या बैठकीत निवडणूक दारूमुक्त करण्याचा ठराव झाला. या वेळी महिलांनी जंगलात असलेल्या दारूभट्ट्यांविषयी सांगितले. महिलांशी चर्चा करून मुक्तिपथ तालुका चमूच्या सहकार्याने अहिंसक कृतीचे नियोजन करण्यात आले. जंगलात जाऊन महिलांनी परिसर पिंजून काढला असता जमिनीत पुरून ठेवलेला 14 ड्रम व 5 मडकी मोहसडवा सापडला. हा संपूर्ण सडवा महिलांनी नष्ट केला. तसेच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्य गावात आणून त्याची होळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

ST Bank: सदावर्ते दाम्पत्याच्या हातून एसटी बँक गेली! सहकार खात्याचा दणका

Latest Marathi News Live Update : सायना नेहवाल, राजकुमार राव यांचे नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT