Yavatmal in Congress 'surgical strike'?
Yavatmal in Congress 'surgical strike'? 
विदर्भ

यवतमाळमध्ये कॉंग्रेसचे 'सर्जिकल स्ट्राईक'?

सकाळवृत्तसेवा

तानाजी सावंतांच्या विरोधात एकजूट
नागपूर ः
विधान परिषदेसाठी होणाऱ्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप-सेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र आले तरी कॉंग्रेसनेही "सर्जिकल स्ट्राईक'ची तयारी केली आहे. यामुळे सर्वांचे या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.

येत्या 19 नोव्हेंबरला या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेने उस्मानाबाद येथील उद्योजक तानाजी सावंत यांना रिंगणात उतरविले आहे तर कॉंग्रेसने "भूमीपुत्र' शंकर बढे यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संदीप बाजोरिया यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेत तानाजी सावंत यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे या निवडणुकीत सेना-भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसची महाआघाडी झाली आहे. या तिन्ही पक्षाचे मते मिळाली तर सावंत यांचा विजयरथ कुणीही रोखू शकत नाही. या तिन्ही पक्षाची मिळून 216 मतदार आहेत. विजयासाठी 222 मतांची गरज आहे.

गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीला स्थानिक विरुद्ध बाहेरचा असा रंग येत आहे. या दृष्टीकोनातून भाजप-सेना व राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी वेगवेगळ्या बैठका घेऊन कॉंग्रेसच्या गोटातल्या लोकांशी बोलणी सुरू केली आहेत. यासंदर्भात काही महत्त्वपूर्ण बैठकाही पार पडल्या आहेत. त्यामुळे सेना-भाजप-राष्ट्रवादीचे नेते एकत्र आले तरी "सर्जिकल स्ट्राईक' करून ही महाआघाडी उद्धवस्त करण्याचा डाव कॉंग्रेसच्या नेत्यांनी आखल्याचे समजते.

राठोडांबद्दल नाराजी?
सेनेचे राज्यमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सेनेमध्येच असलेल्या नाराजीनेही कॉंग्रेसला रसद पुरविली आहे. राठोड यांच्या कार्यपद्धतीने अनेकांना दुखावले आहे. हे दुखणे या निवडणुकीत आणखी उमळण्याची शक्‍यता आहे.

कोट्याधीश उमेदवार
या निवडणुकीत करोडपती उमेदवार अर्ज भरतात. यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उस्मानाबाद येथील तानाजी सावंत यांनी अर्ज भरला आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीचा आकडा 115 कोटी रुपये एवढा आहे. तर कॉंग्रेसचे उमेदवार शंकर बढे यांची संपत्ती 70 कोटी रुपयांची आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT