File photo
File photo 
विदर्भ

पेंढरी जंगलात 300 पोलिसांचा ताफा

सकाळवृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) : अटक वॉरंट तामिल करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून पसार झालेला आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यासाठी पेंढरी जंगलात तब्बल 300 पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांचा ताफा आरोपीचा शोध घेत आहेत.
मारेगाव तालुक्‍यातील हिवरी येथे अनिल लेतू मेश्राम याच्या घरी अटक वॉरंट बजावण्यासाठी सोमवारी (ता.26) रात्री पोलिस गेले होते. पोलिसांवर अनिल व त्याच्या आईने काठीने हल्ला चढविला. त्यात राजेंद्र बाजीराव कुळमेथे (वय 48) यांचा मृत्यू झाला, तर मधुकर मुके (वय 52) व प्रमोद फुफरे (वय 32) दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर लगेच अनिल मेश्राम (वय 35, रा. हिवरी) याने घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी मेश्राम मायलेकाविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला. कालच त्याची आई इंदिरा मेश्राम हिला पोलिसांनी अटक केली होती. वेगाव जंगलात सायंकाळी अनिल स्थानिक गुन्हे शाखा व डीबी पथकाला दिसला. मात्र, अंधार व झाडाझुडपांचा फायदा घेऊन पथकाला हुलकावणी दिली. मंगळवारी (ता.27) आरोपी पेंढरी जंगलात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून अपर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव, दोन उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार, यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा, मारेगाव, वणी, शिरपूर, पाटण, मुकुटबन आदी पोलिस ठाण्यातील तीनशे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र, तो सतत चकमा देत आहे.
मारेकऱ्याला जंगलाची माहिती
पोलिसांवर हल्ला करणारा मारेकरी अनिल मेश्राम हा गुराखी म्हणून काम करतो. त्याला मराठी भाषाही व्यवस्थित बोलता येत नाही. आजूबाजूच्या जंगल परिसराची त्याला इत्थंभूत माहिती आहे. संपूर्ण परिसर ओळखीचा असल्याने लपण्याची जागादेखील त्याला माहीत आहे. मंगळवारी (ता.27) सायंकाळी तो पोलिसांना दिसला. मात्र, अंधाराचा फायदा घेत चकमा दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT