ti.jpg
ti.jpg 
विदर्भ

हिंगोली : वाघाच्या हल्ल्यात तरुण जखमी

जगन्नाथ पुरी

सेनगाव (हिंगोली)  : सेनगाव तालुक्यातील सुकळी खुर्द येथे वाघाच्या हल्ल्यात तरुण जखमी झाल्याची घटना शनिवारी (ता. २) दुपारी एक वाजता घडली आहे. त्यामुळे आता सेनगाव तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सेनगाव तालुक्यातील सुकळीखुर्द येथील संतोष श्रीराम कबाडे (वय २८) यांचे गावालगत शेत आहे. आज सकाळी कबाडे, रमेश आठवले, भगवान शिरसाट हे शेतात सोयाबिनचे पिक गोळा करण्यासाठी कबाडे यांच्या शेतात गेले होते. शेतातील तुरीच्या ओळींमधे कापून  ठेवलेल सोयाबिन जमा करीत असताना तुरीमधून आलेल्या वाघाने कबाडे यांच्यावर पाठीमागून हल्ला केला.

दरम्यान, यामध्ये कबाडे यांच्या खांद्याला व पाठीला वाघाचा पंजा लागला. यामुळे ते जखमी झाले. अचानक झालेल्या हल्ल्याने कबाडे यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील शेतकरी मदतीसाठी धावून आले. त्यानंतर वाघाने तेथून धुम ठोकली. त्यानंतर शेतकऱ्यांनी जखमी असलेल्या कबाडे यांना उपचारासाठी सेनगाव येथे खाजगी दवाखान्यात दाखल केले आहे.

सदर वाघ गावाजवळच आल्यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, वन परिक्षेत्र अधिकारी विश्वनाथ टाक, शेख जमील यांनी तातडीने सुकळी येथे भेट देऊन पाहणी केली आहे. हिंगोली नंतर आता सेनगाव तालुक्यात वाघाची दहशत निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT