Crime
Crime 
विदर्भ

नोकरीचे आमिष दाखवून तरुणाशी अनैसर्गिक कृत्य

सकाळवृत्तसेवा

वणी (जि. यवतमाळ) - नोकरीचे आमिष दाखवून तरुणाशी अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याची घटना वणी शहरात उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणाने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी नागपूर येथील बिल्डरविरुद्घ गुन्हा नोंदविला. 

नागपूर येथील २४ वर्षीय तरुणाला नोकरीची नितांत गरज होती. नागपूर येथील एका व्यक्तीने त्याची भेट बिल्डर योगेश पंजाबी (रा. प्रतापनगर, खामला) याच्यासोबत करून नोकरी मिळवून दिली. २५ हजार रुपये पगार ठरविण्यात आला. ७ जुलै २०१७ ला बिल्डरने वाहनात बसवून तरुणाला वणी येथे आणले. छोरिया ले-आउट गणेशपूर येथील आर्यन हेरिटेज या बिल्डिंगमधील एका सदनिकेत त्याच्याशी अश्‍लील चाळे केले. तरुणाने विरोध केला असता याच कामाचे २५ हजार पगार देण्याचे सांगितले. काही वेळात बिल्डर बाथरूममध्ये गेल्याची संधी साधून तरुणाने तेथून पळ काढला. ही घटना नागपूर येथील बिल्डरच्या मित्राला सांगितली. मात्र, मित्राने याची कुठेही वाच्यता केल्यास जिवानीशी ठार मारण्याची धमकी दिली. तब्बल १४ महिन्यांनंतर तरुणाने बुधवारी (ता. पाच) वणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. 

ग्राहकांचीही केली फसवणूक
बिल्डर पंजाबी हा नागपूर येथील रहिवासी आहे. त्याची आर्यन हेरिटेज या नावाची कंपनी आहे. वणीत बिल्डरने सदनिका बांधल्या आहेत. ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर वणी पोलिसांत यापूर्वीच गुन्हा नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Laughter Day 2024 : हसा लोकांनो हसा! तणाव,हृदयविकाराची करायचीय सुट्टी तर फक्त हसा, हसण्याचे ढिगभर फायदे

IPL 2024, RCB vs GT: विराटचा जबरदस्त डायरेक्ट थ्रो, तर विजयकुमारचा सूर मारत भन्नाट कॅच, पाहा Video

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य (०५ मे २०२४ ते ११ मे २०२४)

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

Sakal Podcast : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला ते रावेरमध्ये लोकसभेत कोण बाजी मारणार?

SCROLL FOR NEXT