अमरावती : युवासेनेचे पदाधिकारी पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर करताना.
अमरावती : युवासेनेचे पदाधिकारी पोलिस निरीक्षकांना निवेदन सादर करताना. 
विदर्भ

युवा सेनेची फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी प्रथम वर्षाच्या (मॅकेनिक) विषयाच्या पेपरफुटीचे प्रकरण तापले. गुन्हा दाखल होताच, आरोपींना तत्काळ अटक करण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी (ता. नऊ) फ्रेजरपुरा ठाण्यावर धडक दिली.
वाशिम जिल्ह्यातील उकडी येथल्या संमती अभियांत्रिकी महाविद्यालयातील लिपिक आशीष एस. राऊत (रा. बोर्डी) यांच्यासह संतगाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील रोजंदारी कर्मचारी या दोघांविरुद्ध विश्‍वासघातासह विद्यापीठ कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्यानंतर दोघेही पसार आहेत. रविवारपर्यंत (ता. नऊ) त्यापैकी कुणालाही अटक झाली नसल्याचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले. यासंदर्भात पोलिसांनी नेमके काय केले. याबाबत जाब विचारण्यासाठी युवासेनेचे जिल्हाप्रमुख आशीष माटोडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पोलिस निरीक्षक श्री. चोरमले यांना निवेदन सादर केले. यात सहभागी लोकांना तत्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी रेटून धरली. युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरूंची भूमिकाही पेपरफूट प्रकरणात संशयास्पद असल्याचा आरोप केला. याप्रकरणात एकापेक्षा अधिक लोक, अधिकारी, कर्मचारी, काही विद्यार्थी सहभागी असल्याने त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेजबाबदार लोकांच्या वर्तणुकीमुळे हुशार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, असेही शिष्टमंडळाने यावेळी नमूद केले.

या कटात जे लोक सहभागी असतील, त्यापैकी कुणाचीही गय केली जाणार नाही. नियमानुसार पोलिस कारवाई करतील.
- आसाराम चोरमले,
पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT