Nagpur ZP
Nagpur ZP 
विदर्भ

झेडपीची सभा ठरणार वादळी

सकाळवृत्तसेवा

नागपूर - जिल्हा परिषदेत गेली चार वर्षे शांत असलेल्या विरोधकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोटाळ्यांसोबत दुष्काळाचा मुद्दा येत्या सर्वसाधारण सभेत विरोधकांकडून मांडण्यात येणार आहे. त्यामुळे बुधवारची सभा वादळी ठरण्याचे संकेत आहेत.

राज्य सरकारने अलीकडेच राज्यातील १५१ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. यात नागपुरातील काटोल, कळमेश्‍वर आणि नरखेड या तीन तालुक्‍यांचा समावेश आहे. परंतु, संपूर्ण जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट असल्याने संपूर्ण जिल्हाच दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी होती. गेल्या वर्षी बोंडअळीचा फटका असूनसुद्धा सर्वसाधारण शेतकऱ्याने किमान १० क्विंटल कापूस पिकविला होता. यंदा हा आकडा २ क्विंटलवर येऊन ठेपला आहे. शिक्षण, महिला, पंचायत विभागात भोंगळ कारभार सुरू आहे. गैरव्यवहार करणाऱ्या सचिवांना वाचविण्याचा प्रयत्न अधिकारी करीत आहेत. विनापरवानगी केसिंग पाइप टाकण्यात आले. यात मोठा घोळ आहे. याच्या चौकशीची मागणी यापूर्वी स्थायी समितीत विरोधकांकडून करण्यात आली आहे. उन्हाळ्यात बोअरवेलचे पूर्ण काम झाले आहे.  एनडीसीसी बॅंकेत जिल्हा परिषदेचे १२ कोटी पडून आहेत. हा पैसा परत सेस फंडात जमा करण्याचा ठरावही सभेत येणार असल्याची समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT