file photo
file photo 
विदर्भ

शेतकऱ्यांनी स्वतः शास्त्रज्ञ व्हावे!

सकाळ वृत्तसेवा

थडीपवनी  (जि.नागपूर):  आधुनिक शेती करताना आपण स्वतः आपल्या शेतीचे शास्त्रज्ञ व्हायला पाहिजे. जेणेकरून शेतीतील कमतरतेची आपल्यालाच माहिती होऊन त्यावर आपणच उपाययोजना करायला पाहिजे. बदलत्या वातावरणाचा, खते व बियाण्यांच्या अतिवापरामुळे शेतीवर होणारा विपरीत परिणाम यावर दुर्लक्ष केल्यास शेती उत्पन्नात घट येते, असे प्रतिपादन कृषी सहाय्यक रूपेश निमजे यांनी केले.
 नरखेड कृषी विभागामार्फत बानोरचंद्र येथे नुकतेच शेती शाळेचे आयोजन करण्यात आले होते. यात शेतकरी महिलांसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग होता. बानोरचंद्र येथील प्रगतिशील शेतकरी अजय भाले यांच्या शेतावर शेतीशाळा पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सध्या बाजारात कपाशीचे अनेक प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. मात्र आपल्या शेतीत हवामानात व व्यवस्थापनात ते टिकेल काय, याचा सर्वप्रथम विचार व्हायला हवा. आज एकमेकांच्या अनुभवातून व निरीक्षणातून गटशेती करणे गरजेचे आहे. रासायनिक पद्धतीचा वापर टाळून सेंद्रिय शेती करणे फायदेशीर कसे ठरू शकते, याबाबत कृषी सहायक ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेती शाळेत लक्ष्मणराव सहारे, बानोर, गौतम इंगळे, सरपंच साहेबराव मोरेकर, पुरुषोत्तमराव गायकवाड, अण्णाजी इरतकर, बाबाराव सोनारे, संजय गायकवाड यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

माझ्याकडे 15 एकर शेती आहे. मागील दोन वर्षांपासून कृषी सहायकांच्या संपर्कात मी असल्याने ते प्रत्यक्ष आमच्या शेतीवर येऊन आम्हाला मार्गदर्शन करतात. आज मी रासायनिक औषधाचा वापर न करता निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, गायीचे गोमूत्र यांचा वापर फवारणीसाठी करत असल्याने माझा खर्च कमी व उत्पन्नात वाढ झालेली आहे.
बाबाराव सोनारे
शेतकरी, दावसा
नैसर्गिक शेती करण्यास थोडी किचकट आहे. पण शेतकऱ्याला शेतीचे "बजेट' मुळात समजत नसल्याने रासायनिक औषधांवर व खतांवर आजपर्यंत अवलंबून होतो. कृषी सहायकांच्या संपर्कात असल्यामुळे मला नैसर्गिक शेती खूप सोपी वाटते. शासनाने अशाच पद्धतीने प्रत्यक्ष शेतीवर नवनवीन प्रयोग करावेत. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासह त्याचा फायदा होऊ शकेल.
अण्णा इरतकर
शेतकरी, बानोरचंद्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update : RTE अंतर्गत शालेय प्रवेशाबाबतच्या कायद्यात राज्य सरकारच्या नव्या सुधारणेला हायकोर्टाची अंतरिम स्थगिती

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT