fact check son marries his mother in pakistan viral video fake post esakal
व्हायरल-सत्य

Fact Check : पाकिस्तानमधील मुलाने स्वतःच्या आईसोबतच केलं लग्न? व्हायरल व्हिडिओ खोटा, डोळ्यात पाणी आणणारी खरी कहाणी वाचा

Pakistani Son Marries his mother viral video : पाकिस्तानातील एका मुलाने त्याच्या आईसाठी दुसरे लग्न केले असा दावा करणारी पोस्ट व्हायरल होत आहे. जाणून घेऊया याच्या मागचे सत्य काय आहे.

Saisimran Ghashi

Created By : Newsmeter

Translated By: Sakal Digital Team

पाकिस्तानातील एका मुलाने आपल्या आईशी लग्न केले, असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओच्या मागे नेमके काय सत्य आहे जाणून घेऊया.

व्हायरल पोस्टमध्ये दावा

सोशल मिडियावर व्हिडिओसोबत शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "एका मुलाने 18 वर्षे आईचे संगोपन केल्यानंतर तिच्याशी लग्न केले. अब्दुल अहदने स्वतः ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली."

या पोस्टची लिंक इथे इथे आणि इथे पाहा.

या पोस्टचे Archieve इथे इथे आणि इथे पाहा.

तथ्य पडताळणी

तथ्य पडताळणी केळी असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे. या मुलाने आपल्या आईशी लग्न केले नाही, तर तिचे दुसरे लग्न ठरवले आणि हा निकाह सोहळा पार पाडला.

पुरावा 1

व्हायरल पोस्टमधील "married off" या शब्दाचा चुकीचा अर्थ लावल्याने संभ्रम निर्माण झाला. "Married off" याचा अर्थ लग्नासाठी एखाद्याची व्यवस्था करणे असा होतो.

पुरावा 2

हिंदुस्तान टाइम्सने 30 डिसेंबर 2020 रोजी एक वृत्त प्रसिद्ध केले ज्यात सांगितले आहे की, पाकिस्तानातील अब्दुल अहद नावाच्या तरुणाने आपल्या आईचे दुसरे लग्न ठरवले. या व्हिडिओमध्ये आई-मुलाच्या प्रेमळ नात्याचे दर्शन घडते.

पुरावा 3

इंडिया टुडेच्या एका वृत्तातही हीच माहिती देण्यात आली आहे की, मुलाने आपल्या आईच्या दुसऱ्या निकाहची व्यवस्था केली होती.

पुरावा 4

इंस्टाग्रामवर अब्दुल अहद नावाच्या व्यक्तीने 18 डिसेंबर 2024 रोजी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये निकाहपूर्वी आई आणि मुलाचे आनंददायी क्षण दाखवले आहेत.

पुरावा 5

20 डिसेंबर 2024 रोजी त्याच इंस्टाग्राम अकाउंटवर त्या लग्नाचे काही फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. मुलाने आपल्या आईशी लग्न केलेले नसून, तिचे दुसरे लग्न लावून दिले आहे. चुकीच्या भाषांतरामुळे आणि मुद्दाम संभ्रम निर्माण करण्यासाठी हा दावा व्हायरल करण्यात आला आहे.

(News Meter या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT