Seema Nitin
Seema Nitin 
वुमेन्स-कॉर्नर

बोलू, वाचू आनंदे! : बोलण्यात ठामपणा आणायचाय? वाचा काय करायचं

सीमा नितीन

तुम्ही व्यासपीठावर बोलत असा किंवा चारचौघांत किंवा अगदी कुटुंबीयांमध्ये; तुमच्या बोलण्यात जितका ठामपणा असेल, तितकं ते बोलणं गांभीर्यानं घेतलं जाण्याची शक्यता जास्त असते. हा ठामपणा अचानक येत नसतो. तो तयारीनं येतो आणि बोलण्यातल्या चुका आपण कशा प्रकारे सुधारू शकतो त्यातल्या हुशारीवरूनही येतो. हा ठामपणा दिसण्यासाठी वरची पट्टी लावण्याची आवश्यकता नाही. अगदी नॉर्मल स्वरात बोलतानाही आपण ठामपणा आणू शकतो. त्यासाठी स्वतःच्या विचारांवर आणि बोलण्यावर दोन्ही विश्वास असला की झालं.

तुमची विचारांची आणि बोलण्यातल्या शब्दांची गती यांच्यात असमानता असली, तरी बोलण्यातला आत्मविश्वास ढासळू शकतो. म्हणजे, डोक्यात तयार होणारे शब्द आणि बोलण्याचे शब्द, यांच्यात समन्वय बरोबर राहील, याची दक्षता घ्या. त्यामुळे योग्य सराव केला, तरी खूप फायदे होतात. ठामपणा हा पुन्हा स्वभावाचाही एक भाग असतो. तो मुद्दाम आणता येत नाही. मात्र, बोलण्यातला ठामपणा आपण सरावानं नक्की आणू शकतो. तसंच, समजा अनुनासिक बोलण्यातले काही दोष जर प्रयत्न करूनही जाणार नसतील, तर त्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासावर कोणताही परिणाम होऊ न देणं, ही गोष्टही महत्त्वाची. ‘बिलिव्ह इन यू’ हा मंत्रही नेहमीच लक्षात ठेवायचा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक जण बोलताना अडखळतात. त्यात प्रत्येक वेळी वाचादोष असतोच, असं नाही. उलट अनेकदा आत्मविश्वासाच्या अभावामुळं अडखळलं जातं. त्यासाठी सगळ्यांत उत्तम उपाय म्हणजे आरशाच्या समोर उभं राहून सलग काही बोलण्याचा सराव करणं. ‘किंग्ज स्पीच’ नावाचा टॉम हूपर दिग्दर्शित एक उत्तम चित्रपट आहे. त्यात ब्रिटनमधला राजा बोलण्यातल्या अडखळण्याच्या दोषावर कशी मात करतो, ते दाखवलं आहे. तो शक्य असेल तर नक्की बघा. महत्त्वाची चर्चा करायची असेल, तर त्याआधी काही मुद्दे कागदावर लिहून घेता येतात का, ते बघा. त्यामुळेही नंतरच्या चर्चेत ठामपणा येतो.

‘बोल’के मंत्र

  • तुमच्या बोलण्यात जितका ठामपणा असेल, तितकं ते गांभीर्यानं ऐकलं जाण्याची शक्यता जास्त असते.
  • बोलण्यातलं अडखळणं ही गोष्ट सरावामुळे नक्की सुधारू शकते. 
  • बोलण्यातला आत्मविश्वास वाढविण्यासाठी आरशासमोर उभं राहून सराव करणं, ही गोष्ट नक्की उपयोगी पडते.
  • महत्त्वाच्या चर्चेआधी कागदावर मुद्दे लिहून ठेवा.

मुलांना हे सांगा

  • लहान मुलांना शक्य असेल, तिथं सोसायट्यांमधल्या स्पर्धा, शाळांमधल्या स्पर्धा, यांत सहभागी व्हायला लावा. त्यातून बक्षिसं मिळणं, ती कला वाढणं, यापेक्षा स्टेज डेअरिंग येणं, ही गोष्ट महत्त्वाची. 
  • मुलांच्या बोलण्यात काही दोष आढळले, तर लगेच तज्ज्ञांना दाखवून ते सुधारण्यासाठी प्रयत्न करा. 
  • पालक मुलांशी कसे बोलतात, त्याचाही मुलांच्या बोलण्यावर परिणाम होत असतो, ही गोष्ट लक्षात घ्या. अनेकदा खूप संतापणाऱ्या पालकांच्या मुलांच्या बोलण्यातला आत्मविश्वास कमी होतो, असं दिसतं. त्यामुळे स्वतःच्या बोलण्याचं आणि वागण्याचंही निरीक्षण करा.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : तिलक वर्माचे अर्धशतक! टीम डेविडचीही फटकेबाजी; मुंबई मिळवणार विक्रमी विजय?

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : पाच वर्षात पाच पंतप्रधान करण्याचा इंडिया आघाडीचा प्लॅन- मोदी

SCROLL FOR NEXT