Silk-Saree 
वुमेन्स-कॉर्नर

पहिल्या साडीची झुळझुळीत कहाणी

रश्मी विनोद सातव

नृत्याचा ताल मुळातच अंगात भिनलेल्या ऋजुतानं आपल्या अभिजात नृत्याचं प्रशिक्षण पंडिता रोहिणीताई भाटे आणि तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे घेतलं आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कथकमध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली. ‘ऋजुता सोमण कला अकादमीची’ संस्थापिका असलेली ऋजुता आंतरराष्ट्रीय पातळीवरची नृत्य-कलाकार आहे. ती सध्या जयपूर घराण्यातले कथकचे बारकावे पंडित राजेंद्र गंगाणी यांच्याकडून शिकत आहे. ऋजुताचं कलेवर प्रेम आहे, तसंच अजून एका गोष्टीवर ती मनापासून प्रेम करते!

ऋजुता, नृत्याची रचना बसवताना आणि सादर करताना जेवढी चोखंदळ आहे, तेवढीच चोखंदळ ती साड्या खरेदी करताना आणि साड्यांचा संग्रह करताना आहे. ऋजुताला कॉलेजमध्ये असल्यापासून साड्या नेसायला भारी आवडायचं; पण तेव्हा तिच्या स्वतःकडे एकही साडी नव्हती. तेव्हा आईच्याच ती साड्या नेसत असे. ऋजुताच्या सख्ख्या भावाचं लग्न ठरल्यावर आईनं खास तिला तिची स्वतःची साडी घ्यायचं ठरवलं. खास स्वतःची अशी साडी मिळणार या कल्पनेनंच ती हरखून गेली. दोघी उत्साहात खरेदीला गेल्या. अनेक दुकानं पालथी घातली; परंतु त्यांना कोणतीच साडी पसंत पडेना. शेवटचं दुकान बघून घरी परतू असा विचार करून त्या दोघी शेवटच्या दुकानात शिरल्या. खरंतर साड्या बघायचा उत्साहच नव्हता. उत्साही दुकानदाराने गठ्ठा आणला आणि पहिली साडी उघडली. ऋजुता आणि तिची आई त्या पहिल्याच साडीच्या बघता क्षणीच प्रेमात पडल्या! ऋजुताचा आवडता रॉयल ब्लू रंग, मऊ मुलायम पोत, काठावर आणि पदरावर केलेलं हटके रेशीम काम, उच्च प्रतीच्या सिल्कच्या धाग्याची चकाकी- सगळ्याच गोष्टी एकदम मनासारख्या जुळून आल्या होत्या. पुढची एकही साडी न बघता त्या साडीची सन्मानपूर्वक खरेदी झाली. त्या रात्री ऋजुताच्या स्वप्नात सारखी तीच साडी येत होती म्हणे! 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भावाच्या लग्नात खूप मनापासून ऋजुतानं ती साडी मिरवली आणि त्या साडीला ‘वाहवा’ही खूप मिळाली. तिचं पहिलंवहिलं फोटो शूटही याच साडीत झालं आणि तिथूनच तिच्या करियरला सुरुवात झाली. त्यामुळे ऋजुतासाठी ही साडी खूप खूप खास आहे. पुढे साड्यांच्या संग्रहात खूप भर पडली; पण ऋजुताच्या या पहिल्या साडीचा मान आज ३० वर्षं झाली तरी तोच आहे. 

आज ३० वर्षं झाली, तरी अजूनही ती साडी आहे तशीच आहे, तोच तजेलदार रंग, तीच चकाकी, तोच मऊ मुलायम धागा, साडीवरचं तेच प्रेम आणि बरंच काही! बाकीच्या बऱ्याच साड्यांचे, डान्सचे ‘कॉस्च्युम्स’ शिवून झाले; पण ऋजुता या साडीला कात्रीच काय कोणाला हातही लावू देत नाही!

ऋजुता त्या साडीबद्दल इतकी ‘पझेसिव्ह’ आहे ना, की ती साडी ऋजुता कुणालाही देत नाही! ऋजुताच्या मनाच्या आणि कपाटाच्या खास ठेवणीतल्या कप्प्यातली ती साडी अशीच तिला उत्तरोत्तर लाभू दे. ऋजुताच्या खास साडीची कथा इति संपूर्णम्!

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: मुंबईनंतर पुण्यातील कबुतर खाद्यबंदीचा वाद उच्च न्यायालयात, थेट पालिकेच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Amar Kale News: शरद पवारांपाठोपाठ खासदार अमर काळेंचंही खळबळजनक विधान; म्हणाले, 'निवडणूक जिंकण्यासाठी...'

Rahul Gandhi Vs Election Commission: राहुल गांधींनी केलेले 'मत चोरी'चे आरोप अन् निवडणूक आयोगाचं प्रत्युत्तर; वाचा सविस्तर!

Pune Traffic : लाडक्या बहिणी आणि भाऊ अडकले वाहतूक कोंडीत

Delivery Boy Life: रक्षाबंधनला झेप्टो, स्विगी, ब्लिंकइटने कमवले ढीगभर रुपये, पण डिलिव्हरी बॉयची कमाई किती माहितीये?

SCROLL FOR NEXT